सहा खासदारांच्या विलिनीकरणासाठी मुहूर्त ठरला
The auspicious moment has been set for the merger of the six MPs.


ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षाने व्हिप बजावूनही ते दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
अशातच या बैठकीतील एक मोठी माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी लगेच पोहोचतो असं सांगूनही संजय दिना पाटील हे आले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत ते खोटं बोलत असल्याचं उघडकीस आलं.
शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालं असून ठाकरेंच्या पक्षात असलेल्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे.
त्यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असून शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच गुरूवारी नवी दिल्लीत संसदीय पक्षाची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्व खासदारांनी उपस्थित राहावेत यासाठी व्हिप बजावण्यात आला होता.
परंतु जे सहा खासदार फुटणार अशी चर्चा होती, त्यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिलं नाही. या बैठकीला खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते.
शुक्रवारच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र ते बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणाहूनच त्यांना फोन लावण्यात आला. त्यावर आपण विमान पकडून लगेच बैठकीला येत असल्याचं संजय दिना पाटील यांनी सांगितलं.
बैठकीला येणार असं शेवटपर्यंत म्हणणारे संजय दिना पाटील हे काही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरबद्दलची आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्या सहा खासदारांनी ठाकरेंना सोडून स्वतंत्र गट निर्माण केला आहे
राज्यात मान्सून सक्रिय; पाऊस कोसळणार, ‘या’ 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा संसदेकडून शनिवारी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर यसस्वी झालं असलं तरी त्याची घोषणा ही शिवसेनेच्या वर्धापणदिनानंतरच केली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
एबीपी न्यूजच्या राजकीय संपादक मेघा प्रसाद यांनी यावर बोलताना सांगितलं की, या सहा खासदारांनी त्यांच्या सह्यांचं पत्र हे लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे.
राज्यात मान्सून सक्रिय; पाऊस कोसळणार, ‘या’ 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भीती त्यामध्ये खासदारांनी व्यक्त केली आहे.
हे पत्र गेल्या 48 तासांपूर्वी देण्यात आलं असलं तरी त्याची घोषणा आता लगेच करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे 20 जून रोजी याची घोषणा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याच दिवशी संसदेकडून बुलेटिन जारी करण्यात येणार असून त्यामध्ये या सहा खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरण होत असल्याचं जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे,
5 जवानांना वीरमरण.भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं
असं मेघा प्रसाद म्हणाल्या. या वेळी लोकसभा अध्यक्ष कदाचित ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना बोलावून चर्चा करतील. परंतु अंतिम निर्णय हा लोकसभा अध्यक्षांचा असेल असं मत मेघा प्रसाद यांनी व्यक्त केलं.
चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
आमदार रोहित पवारांची तब्बेत बिघडली
गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती.
या बैठकीला फक्त संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार हजर होते. गैरहजर खासदारांना पक्षाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
TMC नंतर महाराष्ट्रातील या पक्षातही फुटीची चर्चा
त्याचवेळी फुटलेल्या 6 खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आमच्या पक्षातून निवडून आलात तर आता राजीनामा द्या, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तर आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरु होणार असा इशाराही राऊतांनी दिला.
कोणते खासदार फुटल्याचा दावा?
1. संजय जाधव (परभणी)2. संजय देशमुख (यवतमाळ- वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)








