आमदार रोहित पवारांची तब्बेत बिघडली

MLA Rohit Pawar's health has deteriorated.

 

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. परंतु ही कर्जमाफी करताना सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. विरोधकांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसमध्ये TMC चे विलीनीकरण ?

कर्जमाफीसाठीच्या अटी मागे घ्याव्यात तसेच सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार विठुरायाच्या पंढरपुरात उपोषणाला बसले आहेत.

 

जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मी माझे अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा धारण केला आहे. आता तर रोहित पवार यांनी आणखी कठोर पद्धतीने उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.

 

रोहित पवार यांच्या या भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता रोहित पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे.

 

रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना अन्नत्याग आंदोलनाची पुढची दिशा काय असेल याविषयी सविस्तर सांगितले. मला एसपी साहेबांचा कॉल आला होता. कृषी मंत्र्यांसोबतही माझा कॉल झाला होता.

राज्यात मान्सून सक्रिय; पाऊस कोसळणार, ‘या’ 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

कृषीमंत्री भरणेमामा बीडला गेल्यावर म्हणाले की मंगळवारी आम्ही मुंबईत सर्व मंत्री येणार आहेत. मंगळवारी मला त्यांनी बैठकीला बोलावले आहे. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांचे आहे.

 

त्यासाठी सरकार विशेष बैठत घेऊ शकतं. दत्तमामा माझ्या मागण्यांसाठी सकारात्मक आहेत. मात्र आम्हाला बोलण्याला मर्यादा आहेत असं ते म्हणत आहेत,

 

जुलैमध्येही AC,कुलर लावायची वेळ येणार

अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री यांना विनंती आहे की ज्या अटी लावल्या आहेत त्या काढाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आघाडीतला मित्रपक्ष म्हणून आमच्या ज्या दोन मागण्या आहेत त्याबाबत आश्वासन द्यावे. भाजप किंवा इतर सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने आम्ही या दोन अटी मान्य करायला तयार आहोत,

5 जवानांना वीरमरण.भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं

असे पुढे येऊन सांगितले पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी त्यांनी मांडली. माझा परिवार चिंतेत आहे. माझे वडील इथे बसून आहेत. माझ्या मुलांना हे आंदोलन काय असते हे माहिती नाही.

 

मात्र मुलही म्हणतात आम्ही पण जेवण बंद करतो. माझी पत्नी पण खूप चिंतेत आहे, अशी माहिती यावेळी रोहित पवार यांनी दिली आहे.

 

सातबारावरील ‘ही’ कामे होणार ऑनलाईन
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत आहेत. आम्हाला या कर्जमाफीचा काही उपयोग नाही. त्यामुळे आपल्या मागण्या रास्त आहेत, अशी भूमिका या शेतकऱ्यांची आहे.

 

बीडमध्ये काही शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांची गाडी अडवली. मी आज, उद्या इथे बसेन पण परवा मात्र नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसणार आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

ठाकरेंचा मोठा निर्णय, 3 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हाकालपट्टी

दरम्यान, रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे. त्यांच्या शरीरातील साखर 83 mgdl इतकी कमी झाली आहे. रोहित पवारांनी ORS घेतले पाहिजे असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

 

जर ORS घेतले नाही तर त्यांना सलाईन लावण्याची गरज पडेल, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांनी आराम केला पाहिजे, लोकांशी बोलू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Related Articles