जुलैमध्येही AC,कुलर लावायची वेळ येणार
There will be a need to use ACs and coolers even in July.

मान्सून महाराष्ट्रात तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईपर्यंत मान्सून आतापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. आजवर असं कधी झालं नाही,
संजय राऊत म्हणाले ;अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा.
यंदा अल निनोमुळे मान्सून मुंबईपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात अजूनही अनेक भागांमध्ये मान्सून पोहोचलेला नाही. 20 जूननंतरच पोहोचण्याची चिन्हं दिसत आहेत. तोपर्यंत उष्णतेची लाट आणि मान्सून पूर्व पाऊस असं वातावरण राहणार आहे.
पाच दिवस कोणतीही मान्सूनच्या पावसाची शक्यता नाही. पश्चिमी समुद्र किनाऱ्यावरुन मान्सून पुढे सरकण्याची चिन्हं फारच कमी आहेत. त्यामुळे सध्या तरी 6 दिवस मान्सून येईल याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तर पश्चिम बंगालच्या उपसागराजवळही एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे.
संजय राऊत म्हणाले ;अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा.
त्यामुळे उत्तर भारतात आज आणि उद्या मुसळधार पाऊस राहणार आहे. गुजरात आणि राजस्थान वगळता उत्तर भारतात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. उन्हाचा प्रभाव जास्त राहणार आहे.
ओमानजवळ भारतीय जहाजावर मोठा हल्ला
१४ ते १९ जून या भागात महाराष्ट्रात विशेष पाऊस होणार नाही. काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पाऊस होईल. बाकी संपूर्ण वेळ उष्णता वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० डिग्रीच्या वर जाणार आहे.
अरबी समुद्राकडून मान्सून अजून पुढे सरकण्याचे कोणतेही संकेत न मिळाल्याने आता चिंता वाढली आहे. आधीच घामाच्या धारांनी लोक हैराण झाले आहेत.
राज्यात मान्सून सक्रिय; पाऊस कोसळणार, ‘या’ 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
तर शेतकऱ्यांनी लवकर पेरणी करून नका असं आवाहन केलं आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा मान्सूनचा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.







