TMC नंतर महाराष्ट्रातील या पक्षातही फुटीची चर्चा

After the TMC, there is talk of a split in this Maharashtra party as well.

 

सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA) लोकसभेत आता अधिक मजबूत होण्याच्या तयारीला लागली आहे. ताकद वाढवण्यासाठी देशात सर्वदूर प्रयोग सुरू आहेत.

आमदार रोहित पवारांची तब्बेत बिघडली

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा फुटीर गटाने 19 खासदारांच्या समर्थनाचा दावा केला आहे. तर विरोधी गटातील अजून एका पक्षाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यात असल्याची वार्ता येऊन धडकली आहे.

 

तर द्रमुक पक्षाच्या 22 खासदारांचे पाठबळ मिळण्यासाठी कसरत सुरू आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लोकसभेत 360 जागांची गरज आहे. त्यादृष्टीने दिल्लीसह त्या त्या राज्यात बड्या घडामोडी घडत आहेत.

 

70 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
ममता बॅनर्जी यांनी राजकारणाच्या प्रवाहात आणलेले अनेक खासदारांची ममता आता आटली आहे. त्यांनी तृणमूलमध्येच वेगळा घरोबा केला आहे. पक्षात मोठी बंडाळी उठली आहे.

 

पक्षातील 29 पैकी 19 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केल्याची चर्चा आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र आसन व्यवस्थेची मागणी केली आहे.

 

त्यामुळे लोकसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने 19 खासदारांचे बळ वाढण्याची शक्यता आहे. NDA चा बहुमताचा आकडा 293 वरून 312 इतका होईल.

राज्यात मान्सून सक्रिय; पाऊस कोसळणार, ‘या’ 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातून एनडीएला मोठी शक्ती मिळू शकते. उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार एकाचवेळी पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

कायदेशीर अडचण नको म्हणून एकाचवेळी 6 खासदारांनी पक्ष सोडून गट स्थापन करावा अथवा इतर पक्षात विलीन व्हावे असा पर्याय आहे. शिंदे सेनेसोबत हे खासदार जातात का हा मोठा सवाल आहे. उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्व 9 खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे.

 

राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा
मतदार संघ पुनर्रचना विधेयकानंतर लोकसभेत खासदारांची संख्या वाढेल. हा आकडा 850 इतका होईल. तर नारी शक्ती वंदन अधिनियमातंर्गत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्यात येईल.

 

त्यासाठी घटना (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 मांडण्यात आले होते. पण सरकार तोंडघशी पडली. विरोधकांनी हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही.

रविवारपासून मान्सूनचे आगमन ; काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज

आता TMC, शिवसेना आणि डीएमके तसेच इतर काही पक्षांना स्वतःकडे वळवून हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

Related Articles