राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा

Keep schools in the state open for only three days a week.

 

राज्यातील वाढत्या इंधन दरवाढीमुळे स्कुल बस मालकांवर मोठे संकट ओढावले आहे. पुढील महिन्यात राज्यभरात शाळा सुरु होणार आहेत. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने त्याच दरात स्कुल बसची सेवा पुरवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.

 

त्यामुळे एकाच सत्रात शाळा सुरु ठेवाव्यात, अशी मागणी स्कुल बस संघटनेकडून करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवसच शाळा भरवा आणि दोन दिवस ऑनलाइन वर्ग सुरू ठेवा, असे स्कुल बस संघटनेचे म्हणणे आहे.

पीएम किसान योजनेत सरकारचे नवे बदल

शाळा सुरू होण्याआधी एक जूनपर्यंत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती स्कूलबस मालकांकडून करण्यात आली आहे.

 

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव पाहता राज्यातील स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने इंधनदरवाढीनंतर शाळा सुरू होण्यापूर्वीच बस सेवेचे शुल्क वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

 

सरकारने स्कूलबस क्षेत्राला तातडीने दिलासा देत अनुदान किंवा सवलती द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. यावर आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विधान परिषद निवडणुकीत शिंदें मोठा धमाका करण्याच्या तयारीत

गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात चारवेळा वाढ झाली आहे. सोमवारी देशभरात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यानुसार आता पेट्रोलचे दर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे.

 

यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वात आधी वाढ झाली होती. त्यानंतर दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले होते. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात एकूण 7 रुपये 38 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 7 रुपये 09 पैशांची वाढ झाली आहे.

 

महागाई व वाढलेलले डिझेल पेट्रोलचे दर बघता नागपूर स्कुल बस व स्कुल व्हॅन संघटनेने 10 ते 15 टक्के दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रिमंडळ बैठक 26/05/2026

अंतरानुसार साधारण हजार रुपये भाडे देणाऱ्या पालकांना 1200 व 2000 भाडे देणाऱ्या 2400 रुपये नवीन दर द्यावा लागणार आहे.

 

त्यामुळे पालकांवर शिक्षणाच्या महागाईचा भार वाढला आहे. नवीन नियमानुसार हे भाडे ठरवण्याचा अधिकारी परिवहन विभागाला देण्यात आला त्यामुळे हि दरवाढ परिवहन विभाग मान्य करेल का ? हे बघणं महत्वाचं असणार आहे.

 

मोटेगावकर म्हणायचं ‘झुकेगा नही साला’ आता CBI समोर झुकला
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाने 45 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे.

 

पुढील काही दिवस पाऊस सुरु होईपर्यंत विदर्भातील ही उष्णता कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते.

होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला

10 जूननंतरही विदर्भातील उष्णतेची लाट अशीच कायम राहिली, तर नेहमीप्रमाणे 15 जून रोजी सुरू होणाऱ्या शाळा यंदा थेट 26 जून रोजी सुरू करण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

शालेय शिक्षण विभाग लवकरच यावर बैठक घेऊन याचा आढावा घेणार आहे. या संदर्भात लवकर निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले.

आता नवा कायदा , घर कायमचं बंद असलं तरी भरावे लागणार वीज बिल

तर, नागपूर विद्यापीठात सर्व परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सोबतच केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

 

 

 

Related Articles