होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला

Drone and Missile Attack on Indian Ship in Hormuz

 

 

पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहचला आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्ग होर्मुझ  मध्ये जहाजांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी

नुकतेच एका भारतीय जहाजावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात मोठी खळबळ उडाली असून भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ एका भारतीय मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला झाला आहे. गुजरातच्या द्वारका येथील मालकीचे MSV हाजी अली हे जहाज सोमालियातील बेरबेरा बंदराहून शारजाहच्या दिशेने रवाना झाले होते.

अप्पर जिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक

यावेळी जहाज ओमानच्या किनारपट्टीजवळ असताना अचानक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव होऊ लागला. १३ मेच्या पहाटे ३.३० च्या सुमारास होर्मुझ सामुद्रधुनीत हा भीषण हल्ला केला.

 

या हल्ल्यानंतर काही क्षणातच जहाजाला मोठी आग लागली आणि जहाजा समुद्रात बुडाले. या जहाजावर एकूण १४ क्रू मेंबर्स होते. सुदैवाने सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहे.

ट्रम्प नि घेतला मोठा निर्णय अमेरिकेतील भारतीयांसाठी धोक्याची घंटा?

संकटाची चाहूल लागताच या नाविकांनी प्रसंगावधान सांगत समुद्रात उडी मारली. त्यांनी तातडीने लाईफ जॅकेट्स घातले आणि लाईफ बोटीच्या मदतीने बाहेर पडले. यावेळी ओमानच्या कोस्ट गार्डने देखील तत्परता दाखवत १४ भारतीय नाविकांना सुखरुप बाहेर काढले.

 

 

सध्या या घटनेवर भारतीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस होर्मुझमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला धोका निर्माण होत आहे. ज्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.

तटकरे, पटेल आणि 22 आमदार भाजपच्या वाटेवर ,रोहित पवारांच्या दाव्याने एकच खळबळ

मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेमुळे जागतिक स्तराव तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. परिणामी इंधन दरात वाढ होत आहे. जगावर मोठे उर्जा संकट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

Related Articles