तटकरे, पटेल आणि 22 आमदार भाजपच्या वाटेवर ,रोहित पवारांच्या दाव्याने एकच खळबळ

Tatkare, Patel, and 22 MLAs on the Way to the BJP—Rohit Pawar's Claim Sparks a Sensation.

 

 

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या वेगवान घडामोडी घडत असतानाच आज आमदार रोहित पवार यांनी मोठा बॉम्ब टाकला.

 

राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते प्रफुल पटेल आणि तटकरे यांच्याविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. रोहित पवार यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणात भूकंप येणार का? अशी चर्चा होत आहे.

 

सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार आणि तिथून विधानसभेची निवडणूक लढवणार असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे त्यांचा विषय आहे.

 

पण त्या पक्षात अनेक नेते आहेत. कुणाचे नाव घेतले नाही आणि त्यामुळे कोणी दुखावत असेल. सकाळी धडासी निर्णय आणि नंतर ट्वीट करून त्यात बदल करू असे म्हटल्या जात असेल तर हा त्या पक्षाचा विषय असल्याचे रोहित पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादीतील घाडमोडींवर म्हटले आहे. त्याचवेळी तटकरे, पटेल आणि 22 आमदार हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांनी केला.

 

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अस्वस्थ आहेत चर्चा नाही. ते खरं आहे. पक्षांने त्यांना काढलं आहे. त्यांना डिमोट केलं आहेय सुनील शेळके यांना काय भविष्य कळत का ? तुम्ही भाजप सोडून या आम्ही स्वागत करू.

 

दोन राष्ट्रवादी रोहित पवार यांना एकत्र नको आहे त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. अजित दादांना न्याय मिळण्यासाठी आवाज उठवा आधी. उगीच डोळ्यात पाणी आणून काय होणार नाही, असा टोला त्यांनी शेळके यांना लगावला.

 

आमचा पक्ष भाजपसोबत विलीन होणार नाही असे रोहित पवार म्हणाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्दावर भाष्य केले. सुनील तटकरे हे काल शरद पवार यांना भेटले. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे.

 

त्यांनी या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. तीन वर्षानंतर तटकरे हे पवारांना भेटल्याचे म्हटले जात आहे. या भेटीवर रोहित पवार यांनी भाष्य केले.

 

तटकरे यांना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा. तटकरेंना त्यांच्या अध्यक्षांना काही मॅसेज द्यायचा असेल असे भाष्यही रोहित पवारांनी केले.

 

आमच्या पक्षाबाबत कोणीही भविष्यकाराने भविष्य़वाणी करायची गरज नाही. आपल्या पक्षात काय चाललं आहे बघा. सुनेत्रा पवारांची साथ सोडणार नाही,

 

आम्ही अजितदादांना मानणारे आहोत असे वक्तव्य आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवार यांच्या विधानावर केले. मीडियात बातम्या पेरल्या जातायत, तटकरे, पटेल नाराज नाही.

 

तटकरे, पटेल नाराज असतील तर त्यांनी बोलून दाखवावं. आसाम, गुवाहटीला सुनेत्रा वहिनींसोबत त्यांचा एकत्र पवार, नाराजीचं कारणच नाही. सुनेत्रा पवारांनी एक्स पोस्ट करुन सांगितलेले आहे.

 

मुख्यमंत्रीही आमच्या आमदारांना व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न करतात. महायुतीचा आकडा २३४ वरुन २४० वर पोहचला. त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही त्यांच्या पक्षातल्या लोकांना आमच्याकडे घेऊ असा टोला लगावत रोहित पवारांचं भविष्य एकदिवस खोटं ठरेल, असा दावा अनिल पाटील यांनी केला.

 

Related Articles