अप्पर जिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक

Additional District Collector Arrested Red-Handed While Accepting a Bribe

५० हजाराची लाच घेताना महिला मंडळ अधिकारीला अटक

राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला असून शिपायापासून ते तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक केली आहे.

 

या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरीही लाच घेण्याचं सुरूच असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे एसीबीनेही कारवाई करत धाडसत्र सुरूच ठेवल्याचं आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

भाजपचे बंगालमधील विजयाच्या धांदलीचे प्रकरण डोनाल्ड ट्रम्पच्या दारी

नवी मुंबईतील सिडको येथे थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यास 22 हजारांची लाच घेताना एसीबी पोलिसांनी अटक केली आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबईत लाचप्रकरणात मोठी कारवाई केली असून सिडकोच्या भूमी व भूमापन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी

अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. रामदास जगताप याला सिडको कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आल्याने सिडकोसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

नवी मुंबई एसीबीकडून अप्पल जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली असून या कारवाईने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

 

Related Articles