भाजपचे बंगालमधील विजयाच्या धांदलीचे प्रकरण डोनाल्ड ट्रम्पच्या दारी

The Controversy Surrounding BJP's Victory in Bengal Reaches Donald Trump's Doorstep

 

 

भाजपने ममता दीदींच्या हातातून पश्चिम बंगालचा गड खेचून आणला. या निकालानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्याचे समोर आले होते.

 

या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी तुफान बॅटिंग केली आहे. त्यांनी या सर्व प्रकाराबद्दल थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच ट्वीट केले आहे. राऊतांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

11 राज्यांना IMD चा हाय अलर्ट, मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट

एका राज्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपची पाठ थोपटण्यासारखं काय असा सवाल राऊतांनी विचारला आहे. आता त्यांच्या ट्वीटवरून राजकीय गोटात खमंग चर्चा रंगली आहे.

 

खासदार संजय राऊत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाच्या एका एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे पश्चिम बंगालच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले.

थेट कलेक्टरलाच अटक,मराठवाड्यात खळबळ ;काय आहे प्रकरण

त्यावर एक्सवरूनच संजय राऊत यांनी ट्रम्प यांना एक संदेश पाठवला आहे. ही एक राज्यस्तरावरील निवडणूक होती. राष्ट्रीय स्तरावरील नव्हती. बंगालमधील निवडणूक ही देशातंर्गत बाब आहे. त्यामुळे इतर देशाने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही, अशी खरीखोटी राऊतांनी सुनावली.

 

संजय राऊतांनी एक्सवर इंग्रजीमध्ये एक लांबलचक उत्तर धाडलं आहे. भारतातील खासदार म्हणून मी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्यासंबंधींच्या वृत्तावरून हे उत्तर आपणास लिहित असल्याचे त्यांनी ट्रम्प यांना कळवले.

५० हजाराची लाच घेताना महिला मंडळ अधिकारीला अटक

या ट्विटमध्ये बंगालची निवडणूक ही राज्यस्तरीय आहे. हा भारतीय लोकशाहीचा अंतर्गत भाग आहे. त्यात बाहेरील देशाच्या व्यक्तीने पाठिंबा देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

 

तर पश्चिम बंगालची निवडणूक ही निष्पक्ष झाली नसल्याचा आरोप राऊतांनी ट्रम्प यांना केलेल्या ट्विटमध्ये केला आहे. या निवडणुकीत धमकी,

विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका

दबाव आणि भीती दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले नसल्याचा आणि भाजपसाठी त्यांनी काम केल्याचा आरोप राऊतांनी या ट्विटमधून केला.

 

तर आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी ट्रम्प यांच्या त्या ट्विटचा समाचार घेतला. जेव्हा मी हे वाचले की डोनाल्ड ट्रंप यांनी मोदीना अभिनंदन केले.

विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका

एकतरी ही बातमी खोटी आहे. मला वाटत हे खोट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्या ग्रामपंचायत जिंकल्यावर मोदीना अभिनंदन करतील. अमेरिका डेमोक्रॅटिक देश आहे आणि भारत सुद्धा आहे.

 

भारतात काय चालले आहे हे विश्वात माहिती आहे. या देशात पश्चिम बंगाल आसाम आणि इतर राज्यात काय खेळ लोकशाहीच्या नावाखाली सुरू आहे हे सगळ्याना माहिती आहे.

 

राहुल गांधी यांनी वारंवार सांगितले आहे. कोणत्या राज्याची पार्टी जिंकत असेल तर डोनाल्ड ट्रंप अभिंदन करतील का? तिकडे युद्ध सुरू आहे असे अनेक काम त्यांच्याकडे आहे.

एकनाथ शिंदें हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

भाजप वाले मोदींची छबी खराब करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. मुळात भाजपने खोटी बातमी पसरवली आहे त्यामुळे आम्ही डोनाल्ड ट्रंपला एक माहिती पोचवली आहे. कोणत्या प्रकारे लोकशाही भारताचे आचके देत आहे हे ट्वीटमधून सांगितल्याचा दावा राऊतांनी केला.

 

 

Related Articles