मोटेगावकर म्हणायचं ‘झुकेगा नही साला’ आता CBI समोर झुकला
Motegaonkar used to boast, "I won't bow down, damn it"—but now, he has bowed down before the CBI.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूर आणि नांदेड येथील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक केली आहे.
आता नवा कायदा , घर कायमचं बंद असलं तरी भरावे लागणार वीज बिल
मोटेगावकर यांच्या अटकेनंतर शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, आता समाज माध्यमांवर त्यांचे काही जुने व्हिडीओ आणि रील जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत. यामध्ये त्यांचा ‘पुष्पा’ चित्रपटाच्या स्टाईलचा एक व्हिडीओ सध्या नेटीझन्सचे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे.
‘
शिवराज मोटेगावकर हे परिसरात ‘किंग ऑफ केमिस्ट्री’ या टॅगलाईनने ओळखले जातात. त्यांच्या याच अधिकृत टॅगलाईनखाली काही महिन्यांपूर्वी बनवलेली एक रील आता त्यांच्या अटकेनंतर पुन्हा समोर आली आहे.
हजारोना डॉक्टर केले मात्र मोटेगावकर स्वतःच्या मुलाला डॉक्टर बनवू शकला नाही
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अत्यंत गाजलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील संवादांवर आधारित ही रील आहे. या व्हायरल रीलमध्ये मोटेगावकर ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये संवाद साधताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, “आरसीसी समझके फ्लॉवर समझे क्या… आरसीसी मे तो हर कोई फायर है! ऑफलाईन रेहने दो, ऑनलाईन रेहने दो… झुकेगा नही साला!”
राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीला ब्रेक ;शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या
सीबीआयने मोटेगावकर यांना बेड्या ठोकल्यानंतर हा जुना व्हिडीओ बाहेर आला असून, नेटिझन्सनी यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
“काहीही झाले तरी झुकणार नाही म्हणणारे मोटेगावकर अखेर सीबीआयसमोर झुकले,” अशा आशयाच्या कमेंट्स आणि मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी
NEET परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या तारा महाराष्ट्रातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांपर्यंत जोडल्या गेल्याचे समोर आले होते.
या प्रकरणात सीबीआयने अत्यंत गुप्तता बाळगत मोटेगावकर यांच्यावर पाळत ठेवली होती आणि पुरेशा पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली. सध्या सीबीआयकडून त्यांची सखोल चौकशी सुरू असून, या पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस आणि तपास यंत्रणा घेत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुभेंदू अधिकारी
कोल्हापुरातील RCC क्लासेसच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज आंदोलन करणार आहेत. RCC क्लासच्या बोर्डला काळ फासणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेकडून हे आंदोलन केले जाणार आहे.









