हजारोना डॉक्टर केले मात्र मोटेगावकर स्वतःच्या मुलाला डॉक्टर बनवू शकला नाही

Motegaonkar helped thousands become doctors, yet he could not make his own son a doctor.

 

 

नीटच्या पेपरफुटीप्रकरणात RCC कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला कोर्टाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मात्र स्व:त डॉक्टर नसलेला शिवराज मोटेगावकरने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना MBBS ची कोचिंग देऊन डॉक्टर होण्याच त्यांच स्वप्न पुर्ण केलं.

 

मला माझं स्व:त मेडिकल कॉलेज टाकायचं आहे, मी अनेकांना डॉक्टर करतो. मात्र माझ स्व:तच मेडिकल कॉलेज नाही, अशी इच्छा शिवराज मोटेगावकर त्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना बोलवून दाखवायचा.

आता नवा कायदा , घर कायमचं बंद असलं तरी भरावे लागणार वीज बिल

शिवराज मोटेगावकर याने त्याच्या मुलासाठी पेपरलिक केल्याचा संशय CBI ला आहे. मोटेगावकरच्या मुलाने यावर्षीच 12 वी उत्तीर्ण केली आहे आणि NEET चा पेपरही दिला आहे,

 

 

मात्र मोटेगावकर याचे एक अपुर्ण स्वप्न त्यांना मुलाच्या रुपाने पुर्ण करायचे होते का अशी चर्चा आता होत आहे. मोटेगावकर आणि त्यांची पत्नी ह्या दोघांपैकी एकही जण MBBS डॉक्टर नाहीत आणि तुम्हाला स्व:तचे मेडिकल कॉलेज टाकायचे असेल तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रीय, अनुभवी असण गरजेचं आहे.

ट्रम्प नि घेतला मोठा निर्णय अमेरिकेतील भारतीयांसाठी धोक्याची घंटा?

त्यामुळे मुलगा जर MBBS डॉक्टर झाला तर आपण त्याच्या नावाने मोठं हॉस्पिटल टाकू ही मोटेगावकरांची योजना असल्याचं बोललं जात आहे. क्लासेस लाईनमधून मोटेगावकरांनी कोट्यावधींची संपत्ती जमवली, ते सध्या ED च्या सुध्दा रडारावर आहेत.पण एवढ असूनही मोटेगावकरांचे स्व:तचे मेडिकल कॉलेज नाही.

 

मोटेगावकर हे मुळचे लातूरचे, त्यांचा NEET कोचिंगचा व्यवसाय सुध्दा लातूरमध्येच सेट झाला. त्यामुळे त्यांना लातूर मध्येच मेडिकल कॉलेज टाकायचे होते, मात्र लातूरमध्ये राजकीय नेतृत्व असलेले देशमुख परिवार आपली साथ देणार नाहीत असं मोटेगावकरने 2016 मध्ये एका क्लासमध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलून दाखवलं होतं.

५० हजाराची लाच घेताना महिला मंडळ अधिकारीला अटक

2024 विधानसभा निवडणुकीत मोटेगावकर थेट अमित देशमुख यांच्या प्रचार मंचावर चढले आणि आपण देशमुखांच कुंकू लावलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं, त्यातून त्यांनी मेडिकल कॉलेजसाठी देशमुखांसोबत जवळीक सुध्दा करायला सुरूवात केल्याचं दिसतंय.

 

मोटेगावकर हे व्यावसायीक वृत्तीचे आहेत, त्यांनी क्लासेस लाईनमधून मोठा पैसा कमावला, अनेक डॉक्टर्स घडवले, त्यांचे राज्यातील 8 मोठ्या शहरांमध्ये मोठ मोठे क्लासेस आहेत ज्यात लातूर: (मुख्य केंद्र) पुणे: ( हडपसर), नाशिक, अकोला, छत्रपती संभाजीनगर ,नांदेड, सोलापूर, कोल्हापूर ह्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय

अश्यात त्यांच्याकडे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधून डोनेशनच्या नावाखाली कोट्यावधींची डोनेशन्स जमा झाली असती, आणि त्यांच्या उत्पन्नाला एक नवीन स्त्रोत सुध्दा मिळाला असता, कारण मोटेगावकर यांच्यावर वेळोवेळी कर बुडवल्याच्या प्रकरणातून त्यांच्या घरांची आणि कोचिंग क्लासेसची आयकर विभागाने तपासणी केली होते.

 

 

 

Related Articles