जयपूरहून बंडखोर 6 खासदार आज संध्याकाळी गोरेगावच्या हॉटेलमध्ये दाखल होणार
Six rebel MPs from Jaipur are set to arrive at a hotel in Goregaon this evening.


महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिलेला धक्का आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
दिल्लीतील ‘लीला हॉटेल’मधून थेट राजस्थानच्या जयपूरला हलवण्यात आलेले ठाकरे गटाचे 6 बंडखोर खासदार आज (18 जून) संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत.
1 लाखाची लाच एसीबीनं शिकवला धडा
मुंबईतील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या प्रसिद्ध ‘वेस्टीन हॉटेल’मध्ये या सर्व खासदारांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे.
काँग्रेसमध्ये TMC चे विलीनीकरण ?
उद्या, 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा ६० वा वर्धापन दिन अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे.
हा नेस्को सेंटरचा कार्यक्रम आणि वेस्टीन हॉटेल अगदी शेजारी-शेजारी असल्यामुळेच सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या कारणास्तव सर्व खासदारांना आज संध्याकाळी 6 वाजेनंतर गोरेगावमध्ये आणले जाईल.
या सर्व बंडखोर खासदारांसाठी वेस्टीन हॉटेलमध्ये आधीच विशेष रूम बुक करण्यात आल्या आहेत आणि आज रात्री ते याच हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत.
बंडखोर खासदार 6 संजय जाधव यांना मोठी लॉटरी लागणार ,पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा ?
शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांच्या एकनिष्ठतेची ‘लिटमस टेस्ट’ घेण्यासाठी दिल्लीत संसदीय पक्षाची) बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाने सर्व खासदारांना ‘व्हीप’ देखील जारी केला होता.
मात्र, 9 पैकी 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या 30 मिनिटांच्या ‘कॉन्फरन्स कॉल’ नंतर या खासदारांचे ‘मनपरिवर्तन’ रोखण्यासाठी त्यांना जयपूरला पाठवण्यात आले होते.
सातबारावरील ‘ही’ कामे होणार ऑनलाईन
आता हे सर्व 6 खासदार उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या गटाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी दिलेल्या इशाऱ्यांनंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये,
जुलैमध्येही AC,कुलर लावायची वेळ येणार
यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानासह सर्व 6 बंडखोर खासदारांच्या घराबाहेर स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भारतात मिनी लॉकडाऊन लागणार?
‘व्हीप’चे उल्लंघन केल्यामुळे ठाकरे गट आता कमालीचा आक्रमक झाला असून, अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कडक कारवाई करून त्यांना अपात्र करण्यात यावे,
यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत पत्र लिहिणार आहे. मात्र, बंडखोर खासदारांकडे दोन-तृतीयांश म्हणजेच आवश्यक ते बहुमत असल्यामुळे कायदेशीर लढाईत शिंदे गटच वरचढ ठरणार असल्याचे बोलले जात आहे.









