1 लाखाची लाच एसीबीनं शिकवला धडा

₹1 Lakh Bribe: ACB Teaches a Lesson

 

 

पुण्यातील लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या धाडीमुळे संपूर्ण महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. शेतजमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाईपलाईनच्या परवानगीसाठी अधिकाऱ्यानेच लाच मागितली.

 

यासाठी चक्क एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या लाचखोर ग्राम महसूल अधिकाऱ्याला एसीबीने धडा शिकवला आहे. या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे पुरते दणाणले आहेत.

बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ;4 दिवस थांबा, मुंबईतही हाहा:कार माजेल

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, याप्रकरणी अक्षय शिवाजी कोल्हे या ग्राममहसूल अधिकाऱ्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांनी हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतजमिनीच्या सपाटीकरणासह तिथे विहीर खोदणे

70 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

आणि पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकृत परवानगीसाठी लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, परवानगी देण्यासाठी अधिकारी अक्षय कोल्हे याने सुरुवातीला थेट दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

 

 

लाचखोर अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे लाच मागणीची पडताळणी मोहीम राबवली.

मंत्रिमंडळ बैठक 26/05/2026

या पडताळणी दरम्यान, अप्पर तहसीलदारांकडून फाईलवर मंजुरी आणून देण्याच्या मोबदल्यात अधिकारी कोल्हे याने तडजोड करत १ लाख रुपये घेतल्याचे समोर आले. लाचेची मागणी शंभर टक्के निष्पन्न होताच एसीबीच्या पथकाने थेट कारवाईचा हातोडा उचलला.

 

ही मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या विशेष पथकाने केली.

राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा

या लाचखोरीच्या प्रकरणाचा पुढील सखोल तपास महिला पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे करत आहेत. सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणाऱ्या अशा लाचखोरांवर कारवाई केल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

Related Articles