खासदार पुत्राला होणार अटक?

Will the MP's son be arrested?

 

बीडच्या केसमध्ये विलास घुले यांची हत्या करण्यात आली. भांडणे सोडवण्यासाठी गेल्यानंतर ही हत्या झाली. या हत्येत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलाचे नाव पुढे आल्याने एकच खळबळ उडाली.

 

विलास घुले यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. हत्येच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी विलास घुले यांचे कुटुंबिय तब्बल 11 तास केस पोलिस स्टेशन बाहेर विलास घुले यांचा मृतदेह घेऊन आंदोलनाला बसले होते.

सहा बंडखोरांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका तडकाफडकी फेटळाली

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुले यांच्या नातेवाईकांसोबत रात्री उशीरा फोनवरून संवाद साधला आणि त्यांना आरोपींवर कडक शासन होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विलास घुले यांच्या नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतली.

 

बीडमध्ये विलास घुले यांच्या हत्या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण बघायला मिळाले. नातेवाईक आक्रमक झाल्याने पोलिसांनी जबावात साैरभ बजरंग सोनवणे याच्या नावाचा समावेश केला. भांडण सोडवण्यासाठी गेल्यावर विलास घुले यांच्यावर धारधार शस्त्राने वार झाले. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आले.

खासदारांनंतर आता उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटणार?

नातेवाईकांनी मुख्य सूत्रधार असलेल्या साैरभ बजरंग सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराविरोधात गुन्हा दाखल केला जात नव्हता.

 

 

ज्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. केज तालुक्यात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर आता हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सहा खासदारांच्या बंडानंतर आता सातव्याची चर्चा, शिंदेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
आरोपींवर उमेश माने या व्यक्तीच्या फिर्यादीवरून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

उमेश माने याचे आरोपींच्या नातेवाईकातील एका महिलेसोबतच्या अनैतिक संबंधातून हा वाद सुरू झाला होता. उमेश माने याच्यासोबत सुरू असलेल्या वादात विलास घुले पडल्याने त्याची हत्या झाली.

सहा खासदारांच्या बंडानंतर आता सातव्याची चर्चा, शिंदेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

आता उमेश माने याने फिर्याद दिली असून अटकेत असलेल्या सर्व नऊ आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

खासदार बजरंग सोनवणे आमचे नातेवाईक आहेत, तुला जीवे मारल्यानंतर माझे कोणीच काही करू शकत नाही असे म्हणून आरोपी मारत होते असा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.

विलीनीकरण लांबले?,तांत्रिक बाबीं पूर्ण करणार

विलास घुले हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात खासदारांचे पुत्र सौरव सोनवणे आणि दुसऱ्या फिर्यादीत खासदारांचा उल्लेख आल्याने बीडचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles