अमेरिकेत उडाली खळबळ, इराणची अमेरिकेला थेट मोठी धमकी

Sensation in the US: Iran Issues a Major, Direct Threat to America

 

 

इराण आणि अमेरिका युद्धविराम कराराच्या अत्यंत जवळ पोहोचल्याचे सांगितले जात असतानाच मोठा इशारा इराणकडून देण्यात आला. इराणच्या या इशाऱ्याने एकच मोठी खळबळ उडाली.

बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ;4 दिवस थांबा, मुंबईतही हाहा:कार माजेल

वॉशिंग्टनला थेट हा इशारा देण्यात आला. इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, स्वत:ची वाट लावून घेण्यापासून अमेरिकेला जर वाचायचे असेल तर इराणने ठेवलेल्या अटी मानल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही.

 

आता नवा कायदा , घर कायमचं बंद असलं तरी भरावे लागणार वीज बिल

होर्मुज खाडीत इराणचे नियंत्रण स्वीकारणे हा त्यांच्याकरिता चांगला निर्णय असेल. या युद्धादरम्यान अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजून ती पूर्ण उद्धवस्थ होणार हे नक्की आहे.

 

 

इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांचे सल्लागार मोहसेन रेजाई यांनी अमेरिकेला मोठा संदेश दिला. इराणची तस्त्रीम न्यूज एजन्सीला बोलताना रेजाई यांनी म्हटले की, होर्मुज खाडीत इराणचे नियंत्रण हे कायद्याने अगदी बरोबर आहे. ते कायदेशीर आहे.

डिझेलच्या दरवाढीनंतर आता एसटीचे भाडेवाढ करण्याच्या हालचाली

त्यांनी स्पष्ट केले की, होर्मुज खाडीवर नियंत्रण म्हणणे आम्हाला जागतिक बाजार रोखायचा नाहीये. फारस खाडीतील असुरक्षा रोखणे आणि बाहेरील देशांच्या लष्कराला रोखणे हा इराणचा मुख्य उद्देश आहे.

 

पुढे अमेरिकेला इशारा देत त्यांनी म्हटले की, जर युद्धाच्या रस्त्यांनी चालण्याचे अमेरिकेने ठरवले तर त्यांना त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होईल आणि उद्धवस्थ होईल.

हवामान विभागाचा मोठा इशारा ;गरज असेल तरच घराबाहेर पडा

इराणसोबत चर्चा करून मार्ग काढण्यातच अमेरिकेचा फायदा असल्याचेही त्यांनी म्हटले. यादरम्यान मोहसेन रेजाई यांनी म्हटले की, जर इराणला भीती घालण्याची किंवा कोणत्याही बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली तर इराण कोणत्याही क्षणी परमाणु अण्वस्त्र प्रसारबंदीच्या जागतिक करारातून म्हणजेच एनपीटीमधून तात्काळ माघार घेऊ शकते.

 

आता पेट्रोल-डिझेलचा 5 टक्के साठा सरकारी वाहनांसाठी राखीव
इराणची ही अत्यंत मोठी धमकी म्हणावी लागणार आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण माघार घेताना दिसत नाही. उलट आता त्यांनी अमेरिकेलाच धमकी दिल्याचे बघायला मिळत आहे.

 

इराण युद्धाचा मोठा परिणाम अमेरिकेत बघायला मिळत आहे. स्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामध्येच आता इराणच्या अटी अमेरिका मान्य करणार असल्याचे संकेत आहेत, अमेरिका सर्व बाजूने फसल्याचेही बोलले जात आहे.

 

दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम शांतता करारावर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे युद्धविरामाच्या अत्यंत जवळ दोन्ही देश पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या मित्राला मोठा दणका दिल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेतून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना थेट बाजूला काढले. सध्या नक्की काय चर्चा सुरू आहे आणि कोणत्या मुद्द्यावर करार होत आहे,

 

यापासून इस्त्रायलला बाजूला काढण्यात आले. न्यूयॉर्क टाइम्सने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या मुद्द्यावर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना बाजूला सारत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शांती हवी आहे. न्यूयॉर्क टाइम्सनेच्या रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात इस्त्रायलला चर्चेतून जवळपास पूर्णपणे वगळण्यात आलंय.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलला या युद्धविराम कराराबाबत काहीच माहिती दिली जात नाहीये. यादरम्यान माहिती मिळवण्याकरिता इस्नायलने एक वेगळा मार्ग अवलंबला आहे.

 

राजनैतिक संबंध आणि इराणच्यामध्ये असलेल्या गुप्त सुत्रांकडून इस्त्रायल माहिती मिळवत आहे. इस्त्रायलचा ज्याने साधा कधी विचारही केला नाही, असे काम डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केले जात आहे.

 

ॲक्सिऑसच्या एका अहवालानुसार, हा अहवाल नेतान्याहू यांना मिळाल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत संतप्त प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी ते ट्रम्प यांना बोलत होते,

 

त्यावेळी ते अत्यंत संतप्त होऊनच बोलत होते. यावरून आता हे स्पष्ट दिसत आहे की, सध्याच्या परिस्थितीला डोनाल्ड ट्रम्प यांना इस्त्रायलला मान्य असो किंवा नसो.. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना युद्धविराम करारा करायचा आहे.

 

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. या कारवाईने जगात खळबळ उडावी. थेट इराणच्या सर्वाेच्च नेत्याची पहिल्याच हल्ल्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर इराण इतका खंबीरपणे उभा राहिल, याचा साधा विचारही कोणी केल नाही. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद झाल्याने तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला.

 

Related Articles