वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा:कार; 12 जणांचा मृत्यू,
Rain and Stormy Winds Wreak Havoc; 12 Dead

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. असे असताना आता बिहारमधील हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले.
राष्ट्रवादीत पार्थ पवारांच्या हस्तक्षेपावर छगन भुजबळ का भडकले?
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले. विविध जिल्ह्यांमध्ये वीज पडून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यानुसार, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिहार राज्यातील जनता तीव्र तापमानामुळे चिंतेत होती. आता हे तापमान सुमारे 8 अंशांनी कमी झाल्याने तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
15 राज्यांना 90 किलोमीटर वेगाच्या चक्रीवादळाचा मोठा इशारा
राजधानी पाटणासह दक्षिण बिहार आणि उत्तर बिहारच्या पश्चिम भागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या २४ जिल्ह्यांसाठी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भागलपूर आणि बांका जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे, तर राजधानी पाटणामध्ये पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची दाट शक्यता आहे. शनिवारी राज्याच्या तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नसल्याचे अंदाज आहे.
जरांगेचे उपोषण सुरू होताच मोठा अधिकारी निलंबित
दरम्यान, पाटणा हवामान केंद्राने शनिवारी नैऋत्य बिहारच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे, जिथे सहसा उष्ण हवामान असते. रोहतास, भाबुआ, बक्सर, भोजपूर, अरवल आणि औरंगाबादमध्ये खराब हवामानाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता असून, विजांचा कडकडाटही होणार असल्याची माहिती आहे.
पीएम किसान योजनेत सरकारचे नवे बदल
याव्यतिरिक्त, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सिवान, सारण, नालंदा, जहानाबाद, नवादा, गया, लखीसराय, शेखपुरा, जमुई, मुंगेर, बांका, खगडिया आणि भागलपूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाटाची शक्यता आहे. यामध्ये वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत असेल.
ईशान्य बिहारसह काही जिल्ह्यांमध्ये ३१ मे आणि १ जून रोजी हवामान बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर बिहारच्या पूर्व आणि मध्य भागांमध्ये, जिथे मुसळधार पाऊस पडत आहे,
;तिथे पावसाचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मात्र, हवामान विभागाने आज पहाटे १ ते ५ च्या दरम्यान पूर्व चंपारण,
पश्चिम चंपारण, दरभंगा, मधुबनी, शिवहर, सीतामढी आणि मुझफ्फरपूरमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला आहे.









