साखर खरेदीवर निर्बंध आता 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही
Restrictions on sugar purchases: Sugar will no longer be available in quantities exceeding 3 kg.

वाढत्या साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध स्थरावर उपाययोजना करत आहे. साखरेचे दर अचानक वाढल्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. तर ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडेलंय. दरम्यान, वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
खासदाराच्या मुलाने कारखाली मुलीला चिरडले
ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांनी साखर खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत. ई-कॉमर्स कंपन्या ठरवलेल्या मर्यादेपलीकडे साखरेचा पुरवठा करता येणार नाहीये.
झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टने विकल्या जाणाऱ्या साखरेच्या पाकिटांच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. काही ब्रँड्सनी दोन किलोपेक्षा जास्त,
विमान हेलिकॉप्टरला धडकलं, विमानाचे हवेतच तुकडे
तर इतरांनी तीन किलोची मर्यादा निश्चित केली आहे. परिणामी आता ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांनी साखर विक्रीवर मर्यादा निश्चित केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्वत्र वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. ब्रँडनुसार ही मर्यादा 2-3 किलोपर्यंत बदलत असून साखर खरेदीवरही मर्यादा घालण्यात आली आहे.
झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगीनेही मर्यादा निश्चित केल्या आहेत. सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत आणि आता अनेक क्विक कॉमर्स ॲप्स आणि मोठी दुकाने एका वेळी निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त विक्री करता येणार नाहीये.
राहुल गांधी आक्रमक;सुरु केले संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
परिणामी, लोकांनी एकाच वेळी जास्त साठा करू नये आणि इतर ग्राहकांनाही साखर उपलब्ध होईल याची खात्री करणे, हा यामागील उद्देश आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, स्विगी, इन्स्टामार्टवर सारख्या प्रत्येक ब्रँडच्या साखरेच्या दोन पाकिटांची किंवा दोन किलोची ऑर्डर मर्यादित आहे, तर ब्लिंकइटवर काही पॅक दोन किलोपेक्षा जास्त घेण्यास परवानगी नाही.
ब्लिंकइटवर, एका ब्रँडच्या फक्त एका 3 किलोच्या पॅकला परवानगी आहे आणि झेप्टोवर, एका ब्रँडच्या फक्त एका 2 किलोच्या पॅकला परवानगी आहे. ही मर्यादा सर्वत्र सारखी नाही.
नियमांच्या चौकटीत माणुसकी जपणारा अधिकारी शेख सिकंदर अली
ती ॲप, प्रदेश, ब्रँड आणि स्टॉकनुसार बदलत असल्याची माहिती आहे. झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टने काही साखर उत्पादनांच्या पॅकच्या संख्येवर मर्यादा घातली आहे.
तर दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये, बिगबास्केट काही ब्रँड्सच्या सहा पाकिटांपर्यंत परवानगी देत आहे, याचा अर्थ हा देशव्यापी सरकारी निर्बंध नसल्याचे पुढे आलं आहे.









