हिंगोली जिल्ह्यातील दारुडा मुख्याध्यापक निलंबित
Drunken Headmaster from Hingoli District Suspended

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्कूल ठीक करो या या कॅम्पेनिंगची सुरुवात हिंगोली जिल्ह्यामधून केली होती. हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देत शाळांची दुरावस्था त्यांनी दाखवली होती.
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींना पसंती,मोदींची लोकप्रियता घटली
याच दरम्यान त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या शाळेला भेट दिली होती, या शाळेमध्ये मुख्याध्यापकच भर दिवसा शाळेमध्ये दारू पिऊन राहतो असं निदर्शनास आलं होतं,
संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके हा शाळेतच दारू पीत असल्याचे व्हिडिओ अभिजीत दिपके यांनी समोर आणले होते आणि या शिक्षकावर कारवाई करा, अन्यथा मंगळवारी आंदोलन केलं जाईल असा इशारा दिपके यांनी दिला होता.
हिंगोली जिल्ह्यात अभिजित दीपिकेच्या समोर विद्यार्थी शाळेत झाडू मारु लागले;काय म्हणाले? शिक्षक
अखेर अभिजीत दिपके हिंगोली जिल्ह्यांमध्ये दाखल होण्यापूर्वीच काल संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके याला निलंबित करण्यात आले आहे, तसे आदेश हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहेत.
लिंबाळा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये दारू पिऊन आलेल्या शिक्षकाला करण्यात निलंबित आलं होतं. शाळेला नवे चार शिक्षक द्या या मागणीवर अभिजीत दिपके ठाम आहेत.
थेट आमदाराच्या मुलाची शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी,
जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत जाणार नाही ही भूमिका दिपके यांनी घेतली आहे. फोनवर शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी लेटरहेडवर लिहून देतो असं आश्वासन दिलं होतं. आता अभिजीत दिपके शाळेची पाहणी करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील सरकारी शाळेतील मुख्याध्यापक दारू पिऊन वर्गात झोपलेल्याचा व्हिडीओ समोर आला होता. अभिजीत दीपके यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
गिरीश महाजन यांच्या दोन नातेवाईकांना कुंभमेळा घोटाळा प्रकरणात अटक
लिंबाला गावातील गावकऱ्यांनी आरोप केला होता, मुख्याध्यापक शाळेच्या आवारात दारू पितात. याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिवसाढवळ्या मुख्याध्यापक दारूची बाटली घेऊन शाळेत फिरताना दिसत होते.
एवढंच नाहीतर चक्क शाळेतील वर्गात झोपले देखील होते. धक्कादायक म्हणजे व्हिडीओमध्ये शाळेत आणि वर्गात लहान लहान मुलं आहेत.
थेट आमदाराच्या मुलाची शिवसेना तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी,
या प्रकरणी अभिजीत दीपकेंनी कारवाई न झाल्यास उपोषण करून आंदोलनाचा इशारा दिला होता. अभिजीत दीपके यांच्या इशारानंतर शिक्षकाच निलंबन करण्यात आलं आहे. पण आता शाळेला नवे चार शिक्षक द्या या मागणीसाठी अभिजीत दिपके आंदोलनाला बसले आहेत.









