बापरे.. बाबा रामदेव खासदार कंगनाला म्हणाले विकृत
Oh my... Baba Ramdev called MP Kangana 'perverted'.

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यांची मालिकाच लावलेल्या खासदार कंगना राणावतला योगगुरू बाबा रामदेव यांनी फटकारलं आहे. कंगनाच्या ‘जनरेशन झेड’बद्दल केलेल्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्याच्या बाबा रामदेव यांनी सडकून टीका केली आहे. देशातील तरुणांना ‘गटर जनरेशन’ म्हणणे हे वाईट मानसिकतेचे द्योतक आहे, असे ते म्हणाले.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना बाबा रामदेव यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “तिची शैक्षणिक पात्रता काय आहे? त्यांचे बालपण कसे होते? त्यांचे तारुण्य कसे होते? त्यांची पूर्वीची कामगिरी काय होती? मला अशा लोकांबद्दल बोलायचे नाही.
‘जनरेशन झेड’सह कोणत्याही देशातील कोणत्याही तरुणाला गटर म्हणणे हे विकृत मनाचे लक्षण आहे. हे चुकीचे आहे. जे काही घडत आहे, त्याची तिच्या पक्षाच्या सदस्यांनी दखल घेतली पाहिजे.” ती त्यांच्या योगाची चाहती आहे का, असे विचारले असता बाबा रामदेव म्हणाले,
“जर ती माझी, योगाची प्रशंसा करत असेल, तर मी तिचे गुन्हे झाकावेत का?” बाबा रामदेव असेही म्हणाले की, तरुणांना कोणतीही जात नसते. तरुणांमध्ये सर्वांचा समावेश असतो.
यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित, आदिवासी, वनवासी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अशा सर्वांच्या मुलांचा समावेश आहे. आजची तरुण पिढी ही स्वतःच एक शक्तिशाली शक्ती आहे; हे कोणीही नाकारू शकत नाही.
कंगनाने जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अलीकडेच एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तरुण हिंदू महिलांचे वागणे. त्यांना स्वतंत्र, करिअर-केंद्रित महिलांच्या जीवनाचे अनुकरण करायचे आहे,
पण त्यांना ते स्वातंत्र्य मिळवायचे नाही. ज्या महिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात, त्या बंडखोर निर्णय घेतात, ठाम मते व्यक्त करतात, परंपरा मोडून काढणारे करिअर निवडतात आणि घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेतात,
कारण त्या आपले आयुष्य स्वतंत्रपणे जगतात. त्या हे सर्व आपल्या आई-वडिलांना किंवा कुटुंबाला धोक्यात घालून करत नाहीत. ही तथाकथित पाश्चात्त्य विचारसरणीच्या भारतीय महिलांची नवीन पिढी आहे, जिला मी ‘गटर पिढी’ म्हणते.”









