विद्यमान खासदार करणार भाजपमध्ये प्रवेश ?

Will the existing MP join the BJP?

 

 

 

 

 

राज्यात पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही महायुतीच्या ५ जागांवर तिढा कायम असल्याने उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

 

 

 

 

 

त्यामुळे या ५ जागांवर उमेदवार कधी जाहीर केले जाणार? असा सवाल उपस्थित केला जात असतानाच या जागांवर येत्या २४ तासात उमेदवार जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

एका बाजूला महाविकास आघाडीने ४७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या ५ जागांवर अजूनही प्रतीक्षा सुरू आहे. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

भाजपने आतापर्यंत २७, शिवसेना शिंदे गटाने १० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४ तर राष्ट्रीय समाज पक्ष १ उमेदवार देण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

मात्र अजूनही ६ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत. या जागांवर येत्या २४ तासात उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

 

 

उत्तर पश्चिम मुंबई येथून रवींद्र वायकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून आजच ही उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची

 

 

 

माहिती सूत्रांनी दिली. तर उद्या ३० एप्रिल रोजी रवींद्र वायकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यशवंत जाधव यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

त्याबरोबरच ठाणे येथून रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक किंवा नरेश म्हस्के यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *