Hingoli News;हिंगोली जिल्ह्यातील जयसेन इंगोले यांची मंत्रालयात अवर सचिवपदी पदोन्नती

Hingoli News;Jaysen Ingole from Hingoli district promoted to the post of Under Secretary in the Ministry

 

 

 

मुंबई येथे मंत्रालयात गृह विभागात कार्यरत असलेले कक्ष अधिकारी जयसेन जयप्रकाश इंगोले यांना अवर सचिवपदी पदोन्नती मिळाली आहे.

 

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढुर येथील मूळ रहिवासी आणि परभणीत गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य असलेले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश इंगोले

हे हि वाचा …Political news;महायुतीत तणाव ;मला भाजपने पाडले आता तडजोड नाही,दादांच्या राष्ट्रवादीचा नेता भाजपविरोधात मैदानात

यांचे चिरंजीव जयसेन इंगोले यांचे शालेय शिक्षण परभणीत झाले. मराठवाडा प्राथमिक शाळा, मराठवाडा हायस्कूल व बाल विद्या मंदिर हायस्कुलमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अकरावी व बारावी सायन्सचे शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालयात घेतले.

त्यानंतर अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केली.दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे कंपनीमध्ये नोकरीवर असल्याने त्यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केली.

हे हि वाचा …  लग्नात भेटीच्या फॉर्च्युनर कारची चाबी अजित पवारांच्या हस्ते दिली ?,आता दादा म्हणतात ‘माझा काय संबंध?

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची प्रथम नियुक्ती 2013 मध्ये राज्य कर निरीक्षक, मुंबई या पदावर झाली.
2016 साली कक्ष अधिकारी गट ब पदावर एम.पी.एस.सी.द्वारे नियुक्ती करण्यात आली.

 

ऑगस्ट 2017 मध्ये नागपुर येथे प्रशिक्षण घेतले. जून 2019 पासून ते मंत्रालयात गृह विभागात कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत. दिनांक 22 मे 2025 रोजी त्यांची

हे हि वाचा …Agriculture breaking News;शेतकऱ्यांना सरकारने केले महत्वाचे आवाहन ,हि चूक करू नका !

अवर सचिव गट-अ पदावर पदोन्नती झाली आहे. झी मराठी वाहिनीचे जनसंपर्क अधिकारी तथा कलर्स मराठीचे माजी एक्झिक्युटिव प्रोडूसर कपिल इंगोले यांचे जयसेन हे मोठे बंधू आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *