उद्धव ठाकरेंची या खेळीमुळे अटीमुळे मविआ अडचणीत?
Is Uddhav Thackeray's move putting MAVIA in trouble due to the condition?


पाच जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते,
इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती
या मेळाव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली,
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला आणखी जोर चढला. मात्र अद्याप दोन्ही पैकी कोणत्याही पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये.
दुसरीकडे महायुतीमधील अनेक नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
नोकरी लावून देतो म्हणून सव्वा कोटी रुपये लुबाडले; गळफास घेऊन आत्महत्या
मात्र महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे,
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या कशा लढवायच्या हे शिवसेना ठाकरे गटाकडून ठरवलं जाणार आहे.
शिंदे गटाच्या चार नेत्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्र पक्षाच्या भूमिकेनंतर शिवसेना ठाकरे गट आपली रणनीती ठरवणार आहे,
त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आगामी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढवणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
500 रुपयांच्या नोटा एटीएममधून निघणं बंद होणार?
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे,
अशी मागणी केल्याची माहिती देखील समोर आली आहे. लोकसभेनंतर इंडिया आघाडीची पुढची रणनीती काय? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
बिहार निवडणूक आम्ही लढत नसलो तरी बैठक आवश्यक, असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या अटीमुळे आता महाविकास आघाडीपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अजित दादांच्या आमदाराला लाडकी बहीण योजना ठरतेय डोकेदुखी?
पाच जुलैनंतर सातत्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील आणि तिसरा गट स्थापन होईल,
महाराष्ट्रातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्राकडून मिळाला IAS दर्जा
असं मत महायुतीमधील काही नेत्यांनी व्यक्त केलं आहे, त्यामुळे या निवडणुकीबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.