BREAKING NEWS;शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकीला

BREAKING NEWS; Sharad Pawar's senior NCP leader meets with Mahayuti leaders

bj admission
bj admission

 

 

 

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे.

 

हे सुद्धा वाचा !Corona Breaking News;कोरोनाची साथ ;रूग्णालयांना अलर्ट राहण्याचे आदेश

जयंत पाटील आणि उदय सामंत यांच्या तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नरीमन पॅाईट येथील एक्सप्रेस टॅावरमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी ही भेट झाली आहे.

 

हे सुद्धा वाचा !नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष; पालकांना लाखोंचा गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरूनच ही भेट झाल्याची माहीती आहे. या भेटीत काय राजकिय चर्चा झाली याची माहीती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

 

हे सुद्धा वाचा !विमानाच्या चाकातून आग आणि धूर 250, हज यात्रेकरू बालंबाल बचावले

दरम्यान, सध्याच्या विविध मुद्यावरुन तापलेल्या राजकीय वातावरणात या दोन्ही नेत्यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्यापही समोर आलेला नाही. त्यामुळं या दोन्ही नेत्यांनी याबाबत माहिती दिल्यावरच नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती मिळणार आहे.

 

हे सुद्धा वाचा !Breaking News: दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाणानंतर आपत्कालीन लँडिंग

दरम्यान, गेल्या महिन्यात जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट झाली होती. मागील एका महिन्यातील या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची ही दुसरी भेट होती..

 

हे सुद्धा वाचा !देशातील SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का;एक निर्णयाचा कोट्यवधी लोकांना फटका

रात्री उशिरा मुंबईत ही त्यांची भेट झाली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होते. दरम्यान, एका बाजुला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्या सुरु आहेत.

 

 

अशातच आता दुसऱ्या बाजुला महायुतीतील महत्वाच्या पक्षाच्या प्रमुखाची आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या राज्याच्या प्रमुखांची भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

 

हे सुद्धा वाचा !Maharashtra political breaking news;दोन्ही ठाकरे एकत्र झाल्यास महायुतीची दाणादाण ;सर्व्हेने महायुतीत खळबळ

जयंत पाटील यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

 

 

पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही मागणी जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले की,

 

हे सुद्धा वाचा !मनोज जरांगें यांच्याकडून महायुती सरकारला अल्टिमेटम

‘मी प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीवर विचार करेन.’ दुसरीकडे, जर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले, तर त्या जागी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *