हवामान विभागाचा अलर्ट ;या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
Meteorological Department alert; Warning of heavy to very heavy rain in this district

मुंबईसह चंद्रपूर, गडचिरोली भंडारा आणि गोंदिया येथे पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा 14 देशांवर 40 टक्क्यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’
भारतीय हवामान खात्याने आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2025 रोजी पालघर, पुणे घाट परिसर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासांत 204 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, निघाला मराठी मोर्चा
यामुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो. नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ठाणे, मुंबई आणि संपूर्ण कोकण विभाग, जळगाव, नाशिक घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न
या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासांत 115 ते 204 मिमी वादळी वारे 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट येण्याचीही शक्यता आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2025 रोजी दुपारी 1:20 वाजता कोकण किनारपट्टीवर (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) समुद्राला मोठी भरती येणार आहे.
BREAKING NEWS;गृहमंत्री अमित शाह यांचे निवृत्तीबाबत मोठे विधान
लाटांची उंची सुमारे 4.67 मीटर इतकी असेल. या काळात समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
इतर जिल्ह्यांचा अंदाज: यलो अलर्ट: नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूरचा घाट भाग, बीड, बुलढाणा, अकोला,
आता हॉटेलवर दिसणार जिलेबी,समोसा,लाडू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा इशारा बोर्ड
वाशिम आणि यवतमाळ येथे हलका ते मध्यम पाऊस (65-115 मिमी) अपेक्षित आहे. सोलापूर, सांगली, लातूर आणि धाराशिव येथे पावसाचा जोर तुलनेने कमी असेल. असे असले तरी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खबरदारीचा इशारा दिलाय. पूरग्रस्त भागात प्रवास टाळा, घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घ्या, आणि पाणी साचण्याच्या ठिकाणी जाणे टाळ्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ईडीकडून अटक
किनारपट्टीवरील रहिवाशांनी समुद्रकिनारी जाणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे भरतीच्या वेळी सावधगिरी बाळग्याचे आवाहन करण्यात आलंय.
स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करा. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याबाबत अद्ययावत माहिती घेत राहण्यास सांगण्यात आलंय.
मुंबईतील ७/11 प्रकरणातील आरोपींची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्त्यांची दुर्दशा आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्या उद्भवत आहेत.
राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर पकडला आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाल्यास महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून आज कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे आज ठाणे आणि मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, दरम्यान बदललेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सुरुवातीच्या पावसामुळे विदर्भात मोठं नुकसान झालं होतं, दरम्यान आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
काल देखील हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता, मात्र पावसाने हुलकावणी दिली असून केवळ रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस जिल्ह्यात बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51 टक्के एवढा पाऊस पडला आहे, दरम्यान हवामान खात्याने आणखी दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे, जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. धरणांच्या पाणीपातळीत देखील झपाट्यानं वाढ होत आहे.
कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे .
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उल्हास नदी ही दुथडी भरून वाहत आहे. मात्र बदलापूर परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने अजूनही बदलापूर शहरात कुठेही पाणी साचल्याची घटना समोर आल्या नाहीत , पालिका प्रशासनाने उल्हास नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवली कुडाळ मालवणसह सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 34 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्याला आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.






