राज्यभरात पावसाचा हाहाकार ,मराठवाड्यासह इतर भागाला देण्यात आला ‘हा’ इशारा
Heavy rains across the state, 'Ha' warning issued for Marathwada and other parts

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच काही ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईसह नांदेडमध्ये पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत.
घराची भिंत कोसळून चौघांचा मृत्यू झाला. विक्रोळी पार्कसाईट शालू मिश्रा (वय १९ वर्षे), सुरेश मिश्रा (५० वर्षे) व नांदेडमधील शेख नासेर शेख आमीन आणि त्यांच्या पत्नी शेख हसीना शेख नासेर अशी मृतांची नावे आहेत.
१५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी तुमच्या जिल्ह्यातील ध्वजारोहण मंत्री करणार ,सरकारकडून यादी जाहीर
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस या भागात वरुणराजा धो-धो बरसताना दिसेल.
मुंबई आणि मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईत कालपासूनच पावसाची रिमझिम सुरु असून अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.
महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
दरम्यान, मुंबई आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची आज शक्यता आहे. पालघर आणि ठाण्यालादेखील रेड अलर्ट देण्यात आला आहे.
त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जर काही काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच थांबा. असं आवाहन करण्यात आले आहे.
चक्क १२ जिवंत लोकांना मृत घोषित केले,सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाची पोलखोल
लातूर जिल्ह्यात सर्वत्र तूफान पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील मांजरा, रेणा आणि तेरणा या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे देखील वाहणार आहे.
पाऊस हवामान विभागाकडून रायगड, कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा,
माहिती अधिकारी कार्यकर्त्याला 15 लाखांची लाच घेताना अटक
विजांसह पावसाची शक्यता,सांगली, कोल्हापूर,रायगड, कोकण,मुंबई,रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट,पश्चिम महाराष्ट्रा,पुणे, सातारा,नांदेड, परभणी, हिंगोली,
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह तूफान कोसळण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असे आवाहन करण्यात आले आहे. तर पालघर, जालना, सिंधुदुर्ग, नाशिक, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली,
राज्यातील या सात आयएएस अधिकाऱ्यांचे खाते बदलले
चंद्रपूर, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील सात दिवस देशभरात अतिवृष्टीचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील सात दिवस गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 20 ते 22 ऑगस्टदरम्यान बिहारमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
19, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, सिक्कीम, उत्तराखडं, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून, नदी नाल्याला पूर आला आहे. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये अशीच परिस्थिती राहणार आहे, हवामान विभागाच्या या नव्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे.
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान राज्यात शुक्रवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे, तर मुंबई, पालघर, नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे आज पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे,
तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.






