मंत्रिमंडळ बैठक 19/08/2025

Cabinet Meeting 19/08/2025

bj admission
bj admission

 

 

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने आरोग्य विभाग, रुग्णालय तसेच कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

 

सावधान,राज्यातील 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट!‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

या निर्णयामुळे राज्यातील आरोग्यसेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

 

वोट -चोरी वर राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला निर्वाणीचा इशारा

या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हे निर्णय नेमके काय आहेत? ते जाणून घ्या…

 

 

महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग
मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

 

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी

महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमडंळाने घेतलाय.

 

पुतिन-ट्रम्प यांची बैठक, भारताचं टेन्शन वाढणार ?

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यासही राज्य मंत्रिमंडलाने मान्यता दिलेली आहे.

 

 

आरोग्यसेवा सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयांचा आरोग्य क्षेत्रातील सुविधा सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच या निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल.

 

 

 

Related Articles