शिंदेनी दिल्लीत जाऊन महायुती सरकारची गाऱ्हाणी मांडली मोदी, शहांकडे

Shinde went to Delhi and presented his grievances against the grand alliance government to Modi, Shah.

bj admission
bj admission

 

 

 

 

महायुती सरकारमध्ये सातत्यानं कोंडी होत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.

 

 

राज्य सरकारमध्ये असलेले शिवसेनेचे अनेक मंत्री सातत्यानं वादात सापडत आहे. शिवसेनेची जाणूनबुजून कोंडी केली जात असल्याची पक्षातील मंत्री आणि आमदारांची भावना आहे. या सगळ्या तक्रारी शिंदे यांनी महाशक्ती अर्थात मोदी आणि शहांच्या कानावर घातल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

 

एकनाथ शिंदे गेल्या महिन्याभरात तीनवेळा दिल्लीला गेले. पण दोनवेळा त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना मोदी आणि शहांची भेट मिळाली.

 

 

शहांच्या भेटीला जाताना शिंदे पक्षाच्या खासदारांना घेऊन गेले होते. शहा आणि शिंदे यांच्यामध्ये २५ मिनिटं चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. यासंदर्भात शहांशी चर्चा केल्याचं शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं. सर्वाधिक काळ गृहमंत्रिपदी राहिल्याबद्दल शहा यांचं अभिनंदन केल्याचंही शिंदे म्हणाले.

 

न्यू इंडियन एक्स्प्रेसनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर शिंदे नाराज आहेत. शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांकडून घेण्यात आलेले अनेक निर्णय बदलले जात असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

 

शिंदेसेनेच्या काही मंत्र्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे अस्वस्थ आहेत. आपली हीच कैफियत त्यांनी मोदी, शहांपुढे मांडली. राज्यात सरकारमध्ये असताना मिळत असलेल्या वर्तणुकीमुळे शिंदेसेनेत प्रचंड नाराजी आहे.

 

 

‘महायुती सरकारमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे शिंदे यांची मंत्री नाराज आहेत. त्यांची चलबिचल सुरु आहे. एनडीएमधील भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपकडून आदर, मानसन्मान हवा आहे. याच संदर्भात भाजप नेतृत्त्वाचा शब्द घेण्यासाठी शिंदे दिल्लीला गेले होते.

 

 

आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची कोंडी केली जाऊ नये. सत्तेत समान वाटा मिळावा, अशा मागण्या शिंदे यांनी भाजप नेतृत्त्वाकडे केल्या,’ अशी माहिती सुत्रांनी दिल्याचं द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं वृत्तात नमूद केलं आहे.

 

 

‘माझ्या नेत्यांचा छळ थांबणार असेल तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि भाजप सरकारला बाहेरुन पाठिंबा देईल. सरकारमधून बाहेर पडण्याची शिवसेनेची तयारी आहे.

 

अन्यथा लोकांचा भाजपच्या नेतृत्त्वावरील विश्वास उडेल. हा संदेश शिंदे यांनी बैठकीत अप्रत्यक्षपणे भाजप नेतृत्त्वाला दिला आहे,’ असंही सुत्रांनी सांगितलं.

 

 

गेल्या काही दिवसांमध्ये शिंदेसेनेचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, दादा भुसे असे प्रमुख मंत्री वादग्रस्त ठरले आहेत.

 

या मंत्र्यांच्या कारभारामुळे सरकारच्या कारभारावर परिणाम होत असल्याची भाजपची भावना आहे. या मंत्र्यांवर कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही आहेत. तर शिवसेनेच्या मंत्र्यांना मुद्दामहून लक्ष्य करत असल्याची पक्षाच्या नेत्यांची भावना आहे. सरकारमधील काही जण यामागे असल्याचा संशय सेनेच्या नेत्यांना आहे.

 

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चा असताना शिंदे यांनी काल दिल्लीत जाऊन भाजप नेतृत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या.

 

गेल्या महिन्याभरात शिंदे तीनवेळा दिल्लीला गेले आहेत. मात्र गेल्या दोन दौऱ्यांमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट मिळाली नव्हती.

कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात विद्यापीठाचे उल्‍लेखनीय कार्य

त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं होतं. अखेर काल शिंदे यांना मोदी, शहांची भेट मिळाली. दोन्ही नेत्यांनी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असतानाही शिंदे यांना पुरेसा वेळ दिला.

 

महायुतीत लक्ष घाला, अशी विनंती शिंदे यांनी दोन्ही नेत्यांकडे केली. त्याचवेळी राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर स्पष्टपणे कुरघोडी केली.

 

महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना, आमदारांना अडचणीत आणलं जात असल्याची एकनाथ शिंदे यांची तक्रार आहे. शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असल्यानं सन्मानाची वागणूक मिळावी,

दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला विरोधाचा सामना

पक्षाच्या मंत्र्यांना अडचणीत आणलं जाऊ नये, अशा मागण्या शिंदे यांनी मोदी, शहांकडे केल्याची सुत्रांची माहिती आहे. फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना गोत्यात आणलं जात असल्याची पक्षातील अनेकांची भावना आहे.

 

याच संदर्भात शिंदे दिल्लीत जाऊन कैफियत मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा कुरघोडी करणारा निर्णय घेत ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागानं काल आदेश काढला.

राहुल गांधींचा हल्लाबोल,ट्रम्प 25 वेळा म्हणाले, मी युद्धबंदी केली, मोदींनी एकदाही उत्तर दिलं नाही, ‘दाल में कुछ काला है’;

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित येणाऱ्या नगरविकास विभागानं आधीच यासंदर्भातील आदेश काढलेला होता. आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाकडे आहेत.

 

बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास निवृत्तीमुळे पद रिक्त झालं होतं. त्यामुळे विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी वस्तू आणि सेवा कर आयुक्त असलेल्या आशिष शर्मा यांच्याकडे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. तसे आदेश उमराणीकर यांनी बुधवारी काढले.

ईडीचे अधिकाऱ्यांचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश,घरात सापडली कोट्यवधींची कॅश

विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागानं आदेश जारी करण्यापूर्वी नगरविकास विभागानं याबद्दलचे आदेश जारी केले होते. बेस्ट उपक्रम मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येत असल्यानं

 

आणि सध्या महापालिकेचा कारभार नगरविकास विभागाकडून चालवला जात असल्यानं या विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या स्वाक्षरीनं महापालिकेत कार्यरत असलेल्या अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी काढले होते.

माजी मंत्र्याची मागणी,आता मतदान शाळेऐवजी भाजपच्या कार्यालयात ठेवा

शिंदे यांच्या खात्यानं आदेश जारी केलेला असताना फडणवीस यांच्या खात्यानं आदेश काढला. त्यामुळे शिंदे दिल्लीत असताना राज्यातील प्रशासनावरील वर्चस्व फडणवीस यांनी दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

 

 

Related Articles