विधान परिषदेसाठी महायुतीचे जागावाटप ;पाहा कोणाला कोणत्या जागा
Mahayuti Seat-Sharing for the Legislative Council: See Who Gets Which Seats


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे.
1 लाखाची लाच एसीबीनं शिकवला धडा
अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
महायुतीचे अंतिम जागावाटप-
भाजप -11
शिवसेना – 4
राष्ट्रवादी काँग्रेस – 2
परभणी- हिंगोली विधानपरिषदेची उमेदवारी डॉ नावंदर यांना
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कोणाला कोणती जागा?, संपूर्ण यादी-
भाजप-
1) सोलापूर-
2) जळगाव-
3) भंडारा-गोंदिया
4) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
5) अमरावती-
6) धाराशिव-लातूर-बीड
7) नागपूर-
8) छ.संभाजीनगर- जालना
9) अहिल्यानगर-
10) सांगली-सातारा
11) नांदेड-
शिवसेना-
1) ठाणे-
2) नाशिक-
3) परभणी-
4) यवतमाळ-
राष्ट्रवादी काँग्रेस-
1) कोकण-
2) पुणे-
हजारोना डॉक्टर केले मात्र मोटेगावकर स्वतःच्या मुलाला डॉक्टर बनवू शकला नाही
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही.
अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते.
अमेरिकेत उडाली खळबळ, इराणची अमेरिकेला थेट मोठी धमकी
विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
आधी कोणती जागा कोणाकडे होती? आणि कोणाकडे किती जागा?
आधीचे आमदार कोण?-
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
आता नवा कायदा , घर कायमचं बंद असलं तरी भरावे लागणार वीज बिल
नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ;4 दिवस थांबा, मुंबईतही हाहा:कार माजेल
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम-
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून









