पुढील पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

Warning of rain with gusty winds in Maharashtra for the next five days

 

 

 

गेले काही दिवस धुमाकूळ घातल्यानंतर वरुणराजाने काहीशी उसंत घेतली असली तरी आता गणेशोत्सवात तुफान बॅटिंग करण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

 

 

राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता असून पुढील पाच दिवस गणपतीवर पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

 

पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. राजस्थान आणि पंजाबच्या परिसरात त्याचा दबाव असणार आहे. त्यामुळेच येत्या २५ ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.

 

 

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २५ ते २८ ऑगस्टदरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.

 

 

पुढील पाच दिवस हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील २४ तासांमध्ये रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

 

 

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. १६ ते २१ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील नागरिकांनी पावसाचा तडाखा अनुभवला.

 

 

मात्र त्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे.

 

 

गेल्या आठवड्यात राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता . मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे

काँग्रेस आमदारावर ईडीची धाड

 

.तरीही काही तुरळक भागात हवामान खात्याने मुसळधार पावसाचे अलर्ट दिले आहेत .पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या भागात आज मुसळधार पावसाच्या शक्यता आहे .

 

राष्ट्रवादीचा मोठा आरोप ;नेत्यांच्या घरात बसून प्रभाग रचना, प्रत्येक मतदारसंघात 10 हजारांहून अधिक मते घुसवली

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असून चक्राकार वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान तसेच पंजाब व आजूबाजूच्या परिसरात सक्रिय होत आहेत .

 

चोवीस तासातच त्या 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कोसळला दुःखाचा डोंगर

परिणामी, 25 तारखेपासून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं .

 

25 ते 28 ऑगस्ट दरम्यान कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज IMD ने वर्तवला आहे .

 

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल,म्हणाले ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा
राज्यात पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत .

 

आज रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावरही पावसाचा यलो अलर्ट आहे . मराठवाड्यात धाराशिव लातूर व नांदेडमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यता असून या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे .

व्यापाऱ्याकडील तब्बल पावणे पाच किलो सोने लुटले

 

दरम्यान रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरसह उद्या (24 ऑगस्ट) मराठवाड्यात परभणी नांदेड व हिंगोली मध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

25 ऑगस्ट : 25 ऑगस्ट पासून विदर्भ मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय

तीन महिन्यांत अपघातात ९,३८५ रस्ते अपघात १८०० लोकांचा मृत्यू

.मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार असून कोकणपट्ट्यातील रायगड रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे .

 

 

26 ऑगस्ट : संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, मुंबई सगळं ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय . बहुतांश महाराष्ट्रात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे .

 

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल;मोदींच्या गरम सिंदूरची थंड कोल्ड्रिंक झाली

27 ऑगस्ट : मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सह नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे .बुलढाणा अकोला वाशिम तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय .

 

 

Related Articles