ट्रम्प म्हणतात तेल खरेदी बंद करा,मात्र अडाणी-अंबानी प्रेमापोटी ते करायला तयार नाहीत
Trump says stop buying oil, but Adani-Ambani are not willing to do it out of love

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे भारताबाबत आपली भूमिका मवाळ केली आणि इथून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर भारत आणि अमेरिकेत पुन्हा एकदा Trade Deal वर वाटाघाटी सुरु झाल्या आहेत.
गेरु आणि केमिकल्सपासून बनवलेले दोन ट्रक नकली बटाटे जप्त
22 ते 24 सप्टेंबर दरम्यान वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांनी या मुद्द्यावर चर्चा केली पण, इथेही रशियन तेलाचा मुद्दा आडवा आला. अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी थांबवण्यास सांगितले पण भारत सरकार आपला अट्टाहास सोडण्यास तयार नाही.
अमेरिका रशियापासून तेल घेऊ नका यावर अडलेले आहे मात्र भारतातील मोदी सरकार अडाणी अंबानींच्या प्रेमापोटी याला नकार देत आहे.
स्वस्त तेलाची मलाई उदोगपती खात आहेत भारतातील जनतेला मात्र या स्वस्त तेलाचा दंडीचाही फायदा होत नाही मग भारतावर ट्रम्पची टेरिफ वॉर झेलण्यासाठी तयार मात्र तेल खरेदी नाही हा अट्टाहास का असा प्रश्न उपस्तित होत आहे.
रशियाकडून तेल खरेदी करून भारताने युक्रेन युद्ध भडकवल्याचा डोनाल्ड ट्रम्प सतत आरोप करत आहेत तर दुसरीकडे, त्यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी भारतावर मका म्हणजे Corn खरेदी न केल्याबद्दल आरोपांचा वर्षाव सुरू केला आहे.
भारत अमेरिकन मक्यासाठी आपली बाजारपेठ उघडत नसल्याचा अमेरिकेने आरोप केला असून सर्वात मोठा मका उत्पादक देश, अमेरिका, भारतावर आपलं उत्पादन विकण्यासाठी दबाव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
थेट भाजप नेत्याच्याच घरी ईडीचा छापा
व्यापार करारावरील दोन्ही देशांमधील चर्चा रखडण्याचे हे एक कारण मानले जात आहे. अमेरिकेकडून भारताची मका खरेदी अत्यंत कमी आहे.
2024-25 मध्ये भारताने अमेरिकेकडून फक्त 1000 टन, जो त्यांच्या एकूण मका आयातीपैकी फक्त 0.94% खरेदी केला. म्हणूनच भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार रखडण्याचे मका एक प्रमुख कारण बनले आहे.
मोदी सरकारला आव्हान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक
रशियाकडून कच्च तेल खरेदी करण्यावरून वारंवार भारताला लक्ष्य करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच 25% अतिरिक्त टॅरिफ लादला असून आता व्यापार करारातही या तेलाच्या मुद्द्याला उचलून धरत आहेत.
व्यापार करारातही या तेलाच्या मुद्द्याला एक मुद्दा बनवत आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवत नाही तोपर्यंत व्यापार करार होणार नाही असे अमेरिकेने स्पष्ट म्हटले आहे.
महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून मोदी इथे येत नाहीत ? उद्धव ठाकरे
रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून अमेरिकेने भारताला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ट्रम्प यांच्या विधानावरून स्पष्ट होते की भारत-अमेरिकेतील व्यापार कराराचा मार्ग रशियन तेलातून जाईल. ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या आग्रहाने या करारात अडथळा आणत आहेत.
अमेरिकेकडून मका खरेदीवर भारतावर दबाव आणला जात आहे. भारताने आतापर्यंत या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे पण,
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
अनुवांशिकरित्या सुधारित मक्याच्या आयातीवरील काही निर्बंध उठवण्यास सहमती दर्शविली आहे. ईटीच्या अहवालानुसार अमेरिकेकडून भारत मका खरेदीवर काही सवलती देण्याची शक्यता आहे.
भारत व्यापार करार अंतिम करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत असून अमेरिकेकडून अंदाजे $40 अब्जच्या मोठ्या खरेदीचा भारत विचार करत आहे. यामध्ये कॉर्न, संरक्षण आणि तेल यांचा समावेश आहे.
राहुल गांधी चार देशांच्या दौऱ्यावर
जीएम कॉर्नची मर्यादित खरेदी देखील केली जात असताना नॉन-कोर डेअरी उत्पादनांच्या खरेदीवर देखील चर्चा सुरू आहे पण, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रशियन तेलावरील आग्रह सोडण्यास तयार नाही.






