महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून मोदी इथे येत नाहीत ? उद्धव ठाकरे

Why is Modi not coming here because there are no elections in Maharashtra? Uddhav Thackeray

 

 

पावसामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. शेत जमिनी वाहून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या.

 

“शेत जमीन पुन्हा पीक घेण्यायोग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतील. आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे.

 

आता जमीन साफ करायचाच एकरी खर्च 5 लाख आहे. शेत जमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

“आता शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे, ते तो फेडणार कसं?. मुलांची वह्या, पुस्तक वाहून गेली ती कशी घ्यायची या विंवचनेमध्ये शेतकरी आहे. रोज आत्महत्येच्या बातम्या येत आहेत.

 

एका घरात 31 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्याला पंधरा ते वीस दिवसांच बाळ आहे. मागच्या दोन तीन वर्षात जाहीर केलेली मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

“2017 च्या कर्जमाफीची अजून प्रतिक्षा आहे.माझं सरकार आलं तेव्हा मी कालबद्ध पद्धतीने कर्जमाफी केली. संकट आल्यावर पंचाग काढून बसलो नाही.

 

मला यात राजकारण आणायचं नाही. पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करणं मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा. पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रुपये कालबद्ध मदत तिथल्या सरकारने शेतकऱ्याला जाहीर केली. याला म्हणतात सरकार.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ड्रग्ज तस्करांच्या यादीत टाकले

पंतप्रधानांनी पंजाबला 1600 कोटी आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला 50 हजार रुपये मदत द्या.

 

महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, परिस्थितीवर चर्चा केली. समोर दिसतय तर चर्चा कसली करता. दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला. समोर दिसतय तर प्रस्ताव कसला पाठवायचा?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय;आता सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्यास बंदी

“महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का?. बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 75 लाख महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये टाकले.

 

बिहारला मदत करताय म्हणून पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाल भरभरुन मतदान केलं, आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थेट भाजप नेत्याच्याच घरी ईडीचा छापा

पीकं उध्वस्त झाली , जमीनी खरडून गेल्या, मुलांच्या वह्या, दप्तर वाहून गेली, थोडक्यात सांगायचं तर त्यांचं अख्खं आयुष्यच वाहून गेलंय,

अशा शब्दांत उद्धव यांनी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील दारूण परिस्थिती कथन केली. या शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगरातून बाहेर काढा, असं म्हणत त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा पुनरुच्चार केला.

 

गेल्या आठवड्यात मी, काही सहकाऱ्यंसह एक दिवसाची मराठवाड्याची भेट घेतली. या वेळची आपत्ती भयाण आणि भीषण आहे. आभाळ फाटलं म्हणजे काय ही दाखवणारी परिस्थिती आहे.

गडकरींच्या पापाचा घडा;,टोलमधून मिळालेला पैसा IDL कंपनीमार्फत थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला

आत्ताही मराठवाड्यात पाऊस आहे. पावसाने शेतकऱ्याच्या, आपल्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अनेकांच्या जमीनी खरवडून निघाल्या, पीकं तर उद्ध्वस्त झालीच, घरदारं वाहून गेली.

 

मुलाबाळांच्या वह्या, पुस्तक, दप्तरं, अख्खं आयुष्य वाहून गेलं.संकटात भर म्हणून डोक्यावर कर्जांच ओझं आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक होत होत्या, तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या;उद्धव ठाकरे

त्यांच्या हातात सोयाबीन, कापूस वगैरे पीक होतं, आत्ताचचं सरकार तेव्हा होतं, पण हमीभाव देत नव्हते, त्यामुळे असंतोष होता . हमीभाव खूप कमी मिळत होता म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता.

 

दुर्दैवाने आता , होत्याचं नव्हतं झालं, जे पीक हाताशी आलं, ते पूर्ण उद्ध्वस्त झालं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील दारूण परिस्थिती कथन केली.

लाडक्या बहिणींना 10 हजार
तेथील शेतकरी माझ्याशी हक्काने बोलले. तुम्ही जशी कर्जमाफी केली, तशीच कर्जमाफी करायला या सरकारला भाग पाडा, अशी मागणी ते आवर्जून सांगत होते.

 

आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून, संकटातून बाहेर काढायला हवं. सरकारने जी मदत जाहीर केली ती खूप तुटपुंजी आहे, त्याचं कारण म्हणजे एखाद्या वेळेस शेती उध्वस्त झाली ,

,राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर ,भाजपने साडी नेसवलेल्या मामा पगारेंचा करणार सन्मान

त्याला नुकसानभरपाई दिली, तो शेतकरी कसातरी तग धरू शकतो. पण यावेळेस तर शेतजमीनच खरवडून गेली आहे, आजूबाजूने वाहणाऱ्या नद्यांचं पाणी शेतात घुसलं आणि जमीनीवरचं पीक तर गेलंच पण,

 

तिथली मातीही गेली. तिथले दगड, गोटे, मुरूम हे सगळे वर आलेत. ती जमीन सावरायची झाली, पुन्हा पीक घ्यायचं झालं तर किमान 3 ते 5 वर्ष लागू शकतात, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

ही परिस्थिती पाहता, सरकारने केलेली मदत ही जेमतेम हेक्टरी 7-8 हजार रुपये अशी मदत होईल. पण जमीन साफ करायलाच खूप पैसे लागणार, मेहनत लागणार.

मोदी सरकारला आव्हान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक

त्यानंतर तो शेतकरी पुन्हा पीक काढायला जाईल, 2-3 वर्ष यात जातील, पण आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे, ते तो कसा फेडेल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

 

Related Articles