देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करता, पाकिस्तानसोबत निर्लज्जासारखी मॅच खेळताय, हीच का देशभक्ती?

Arresting the patriot Sonam Wangchuk, playing a shameless match with Pakistan, why is this patriotism?

 

 

जो व्यक्ती देशाच्या लष्करासाठी संशोधन करतोय, अनेक नवे शोध लावतोय त्या सोनम वांगचूकला अटक करताय आणि ज्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला त्याच्यासोबत अजूनही निर्लज्जासारखं क्रिकेट खेळताय, हीच का तुमची देशभक्ती?

राहुल गांधींच्या दणक्याने निवडणूक आयोगाची झिंग उतरली ;घेतला मोठा निर्णय

असा करडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. देवेंद्र फडणवीसांच्या अंगलट कोणतीही गोष्ट आली तर ते त्या विषयाला फाटे फोडतात

 

असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही टीका केली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांनी पीएम केअर फंडातून 50 हजार कोटींची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी मराठवाड्याच्या दौऱ्यावर ,भाजपने साडी नेसवलेल्या मामा पगारेंचा करणार सन्मान

लेहमध्ये झालेल्या आंदोलनाला सोनम वांगचूक हेच कारणीभूत असल्याचा आणि त्यांनीच आंदोलकांना फूस दिल्याचा आरोप गृहमंत्रालयाने केला आहे. गृहमंत्रालयाचे आरोप सोनम वांगचूक यांनी फेटाळले आहेत.

 

मागच्या निवडणुकीत दिलेला शब्द केंद्र सरकारने पाळला नाही अशी टीका वांगचूक यांनी केली. त्यानंतर सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

 

सोनम वांगचूक यांनी लडाखमध्ये मायनस डिग्री सेल्सियसमध्ये काम करणाऱ्या भारतीय लष्करासाठी संशोधन करून त्यांचे काम सुलभ केलं आहे. वांगचूक यांनी अनेक शोध लावले आहेत.

महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून मोदी इथे येत नाहीत ? उद्धव ठाकरे

पण त्यांना रासुका लावून अटक केली. पण ज्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, त्यांच्यासोबतच क्रिकेट खेळताय? उद्याच्या सामन्यावर बहिष्कार टाका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

 

मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मराठवाड्यातील शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यांना जर भरपाई दिली नाही तर शेतकरी संपेल.

 

त्यामुळे हीच खरी वेळ आहे, शेतकऱ्याला कर्जाच्या डोंगरातून काढायची. राज्य सरकारने राज्याचे विशेष अधिवेशन बोलवावं आणि शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी.”

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

पीएम केअर फंडामध्ये महाराष्ट्रातून मोठा निधी जातो. पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी पीएम केअर फंडातून 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

 

राहुल गांधी चार देशांच्या दौऱ्यावर
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला दिला होता.

 

ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये. कोविडसाठीच्या फंडातले 600 कोटी ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाहीत, असा आरोपही फडणवीसांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. अंगलट आलं की फडणवीस फाटे फोडतात, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.

 

ट्रम्प म्हणतात तेल खरेदी बंद करा,मात्र अडाणी-अंबानी प्रेमापोटी ते करायला तयार नाहीत

राज्यातील नुकसानग्रस्तांना सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारची मदत तुटपुंजी आणि थट्टा करणारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Related Articles