मराठवाड्यातील शिंदेंचे मंत्री संकटात? चौकशी सुरू
Shinde's ministers in Marathwada in trouble? Investigation underway

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे अनेकदा विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसंच विरोधकांकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात येत आहेत.
सरन्यायाधीशांसोबतच्या घटनेवर पवारांनी व्यक्त केली चिंता,म्हणाले ही देशासाठी धोक्याची घंटा
अशातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांची शासनस्तरावर तीन प्रकरणात चौकशी सुरू आहे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी विरोधकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, आता मात्र विरोधक या प्रकरणात शांत झाल्याचे चित्र आहे, असे पत्रकारांनी अंबादास दानवे यांना विचारले असता ते बोलत होते.
दुय्यम निंबधक कार्यालयात मंत्र्यांचा छापा, अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
अंबादास दानवे म्हणाले, संजय शिरसाट यांच्यावर आम्ही आरोप केले होते व या आरोपांची चौकशी शासनाने करावी अशी मागणी केली होती. शासन चौकशी करेल याचा आम्हाला विश्वास होता.
शासनाने त्यांची तीन प्रकरणात चौकशी सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. चौकशी सुरु असल्यामुळे आम्ही सध्या शांत आहोत.
पाहा VIDEO; प्रियांका गांधींनी चक्क मागितली आलिया भट्टची माफी; काय घडले कारण ?
महापालिकेच्या निवडणूकीसाठी राज्यातील अन्य काही शहरांमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात पक्षाची काय भूमिका आहे असे दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या आम्ही आपलीच तयारी करत आहोत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जसे निर्देश येतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल. सध्यातरी आम्ही कोणत्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही.
धनुष्यबाण कोणाचे ? सर्वोच्च न्यायालयात पुन्हा तारीख पे तारीख
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दल बोलताना दानवे म्हणाले, “कबुतर, कुत्रे या बद्दलचे निकाल न्यायालयात लागतात,
पण पक्ष आणि चिन्हाबद्दल तारीख पे तारीख दिली जाते. न्यायालयाबद्दल काही बोलता येत नाही. भगवान के घर देर है अंधेर नही, यावर आमचा विश्वास आहे,” असा उल्लेख त्यांनी केला.
मतांची चोरी कशी करण्यात आली;राहुल यांनी केल्या तीन प्रमुख मागण्या
शिवसेना ठाकरेंचीच आहे, ती दुसऱ्यांची होऊ शकत नाही असे ते म्हणाले. यावेळी महानगर प्रमुख रेणुकादास (राजू) वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








