पाहा VIDEO; प्रियांका गांधींनी चक्क मागितली आलिया भट्टची माफी; काय घडले कारण ?

Watch VIDEO; Priyanka Gandhi apologizes to Alia Bhatt; What happened because?

 

 

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा या संपूर्ण देशामध्ये जोरदार प्रचार करत असतात. पक्षाची विचारधारा पोहचवण्यासाठी प्रियांका गांधी प्रयत्न करत असतात.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ,वकिलाला अटक

प्रियांका गांधी मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) रोजी केरळ दौऱ्यावर होत्या. सोशल मीडियावर त्यांनी या दौऱ्याबाबत पोस्ट केली. मात्र या सोशल मीडिया पोस्टमध्ये खासदार प्रियांका गांधी यांनी

 

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची चक्क माफी मागितली आहे. त्याचबरोबर तिच्या अकाऊंटला टॅग देखील केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हास्यकल्लोळ झाला.

247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाची सोडत जाहीर

कॉंग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांनी केरळमधील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची मोठ्या आपुलकीने चौकशी केली.

 

तसेच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शेतकरी भेटीवेळी प्रियांक गांधी यांना आलिया भट्ट नावाची गाय भेटली.

 

वायनाडच्या लोकसभा सदस्या प्रियांका गांधी यांनी केरळमधील कोडेनचेरी येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांशी अलिकडेच झालेल्या संवादाबद्दल एक्स वरील पोस्टमध्ये या असामान्य भेटीचा उल्लेख केला. त्यांचे हे कारण ऐकून सर्वांनाच हसू आले.

बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा;दोन टप्प्यात मतदान, मतमोजणी 14 नोव्हेंबरला

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यांना टॅग करत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी खास भेटीबाबत पोस्ट केली. त्या म्हणाल्या की, “एका गोड कुटुंबाने चालवलेल्या डेअरी फार्ममध्ये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटाला भेटले

 

आणि यावेळी आलिया भट्ट नावाच्या गायीलाही भेटले. आलिया भट्टची मी माफी मागतो, पण ती खरोखरच गोंडस होती.” ते म्हणाले की दुर्दैवाने, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे

दुय्यम निंबधक कार्यालयात मंत्र्यांचा छापा, अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे

आणि त्यापैकी बरेच जण उदरनिर्वाह देखील करू शकत नाहीत, अशी खंत देखील खासदार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली आहे.

 

या दौऱ्यावेळी प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पशू खाद्याची किंमत मोठी वाढली असून शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.

रेल्वेचा निर्णय;आता कन्फर्म तिकिटाची तारीख बदलता येईल

खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “मी संबंधित मंत्रालयाला पत्र लिहून त्यांना पशुवैद्यकीय औषधांच्या वाढत्या किमती, पुरेशा विमा संरक्षणाचा अभाव

 

 

आणि चांगल्या दर्जाच्या पशुखाद्य मिळण्यात येणाऱ्या अडचणींसह अनेक समस्यांबद्दल जाणीव करून देऊ इच्छिते.” काँग्रेस सरचिटणीस पुढे म्हणाले,

सरकारचा निर्णय;मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांचे विलीनीकरण

“या समस्या मला समजावून सांगण्यासाठी वेळ काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा मी आभारी आहे. मी सर्वतोपरी मदत करेन.” असे आश्वासन खासदार प्रियांका गांधी यांनी दिले आहे.

 

 

Related Articles