मंदिरातून 42 किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ

42 kg gold stolen from Sabarimala temple

 

 

शबरीमला मंदिराच्या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या दोन मूर्तींमधून (द्वारपालकांमधून) सोनx चोरीला गेलं असल्याचं आतापर्यंतच्या तपासात निदर्शनास आलं असल्याचं केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितलं.

 

न्यायालयाने फौजदारी खटला दाखल करण्याचे आणि विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठवाड्यातील शिंदेंचे मंत्री संकटात? चौकशी सुरू

न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही आणि केव्ही जयकुमार यांच्या खंडपीठाने एसआयटीला सहा आठवड्यांच्या आत त्यांचा तपास अहवाल सादर करण्याचे

 

आणि दर दोन आठवड्यांनी स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तपासाशी संबंधित कोणतीही माहिती लीक होऊ नये असंही कोर्टाने सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा वार, मुंबईतील 7 कंपन्या अन् 8 भारतीयांवर बंदी

खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की उन्नीकृष्णन पोटी (सोन्याचा मुलामा चढवण्याचा सल्ला देणारे प्रायोजक) यांना मोठ्या प्रमाणात सोने देण्यात आले होते. त्यांना अंदाजे 474.9 ग्रॅम सोनं देण्यात आलं होतं.

 

1998: उद्योगपती विजय मल्ल्याने शबरीमला मंदिराच्या छताला आणि द्वारपालाच्या मूर्तींना सोन्याचा मुलामा लावण्यासाठी 30.3 किलो सोनं दान केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा वार, मुंबईतील 7 कंपन्या अन् 8 भारतीयांवर बंदी

2019: त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबी) द्वारपालाच्या मूर्तींमधील सोन्याचा मुलामा दिलेले तांब्याचे प्लेट आणि पेडम काढून नूतनीकरणासाठी चेन्नईस्थित कंपनी स्मार्ट क्रिएशन्सला दिले.

 

19 जुलै 2019 रोजी तयार केलेल्या अहवालानुसार, 12 तांब्याच्या प्लेटचे एकूण वजन 25 हजार 400 किलो होते आणि पेडमचे वजन 17,400 किलो होते. याचा अर्थ सर्वांचं एकूण वजन 42,800 किलो होते.

 

29 ऑगस्ट 2019: नूतनीकरणानंतर जेव्हा स्मार्ट क्रिएशन्सने वस्तू परत केल्या तेव्हा त्यांचं वजन फक्त 38,258 किलो होते. हे मागील वजनापेक्षा 4.541 किलो कमी होते.

जैन समाजाने दिला महायुती सरकारला दिला इशारा,काढला स्वतःचाच पक्ष

सप्टेंबर 2019 मध्ये जेव्हा द्वारपालकाच्या मूर्तींवरील सोन्याचा मुलामा असलेल्या प्लेट्स आणि पीडम पुन्हा बसवण्यात आले तेव्हा टीडीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे वजन अधिकृतपणे नोंदवलं नाही. शिवाय, नूतनीकरणात वापरल्या जाणाऱ्या सोन्याच्या प्रमाणाची नोंद करण्यासाठी कोणतंही रजिस्टर ठेवण्यात आले नव्हतं.

 

6 ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत, उच्च न्यायालयाने द्वारपालक मूर्तींमधून सोन्याच्या चोरीची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली.

मंत्री लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल

न्यायालयाने उन्नीकृष्णन पोटी यांच्या ईमेलचाही संदर्भ दिला, जो त्यांनी 9 डिसेंबर 2019 रोजी त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या (टीडीबी) अध्यक्षांना पाठवला होता.

 

उन्नीकृष्णन यांनी ईमेलमध्ये लिहिले होते, “शबरीमला गर्भगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि द्वारपालक मूर्तींवर प्लेटिंग केल्यानंतर, माझ्याकडे काही सोनं शिल्लक आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले , शेतकऱ्यांचा पॅकेज म्हणजे महायुती सरकारची ही सर्वात मोठी थाप

मी टीडीबीसोबत मिळून याचा वापर मदतीची गरज असलेल्या मुलीच्या लग्नासाठी करू इच्छितो. कृपया तुमचा अभिप्राय द्या.”

 

उच्च न्यायालयाने म्हटले की, टीडीबीचा एक अधिकारीही या घोटाळ्यात सामील होता. 2019 मध्ये उन्नीकृष्णन यांना सोन्याचा मुलामा देण्यासाठी सोपवण्यात आलेल्या मूर्तींवर फक्त तांब्याच्या प्लेट नव्हत्या

गुप्तधनाचे आमिष दाखवत भोंदूबाबाने लावला लाखोंचा चुना

तर 1999 मध्ये त्यांच्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आला होता, असं न्यायालयाने नमूद केले. या खुलाशामुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

 

न्यायालयाने म्हटलं आहे की, “हा खुलासा अस्वस्थ करणारा आहे. यावरून टीडीबीचे अधिकारी देखील उन्नीकृष्णन यांच्यासोबत सहभागी आहेत असं दिसत आहे.

AI मुळे जगभरातील सुमारे 30 कोटी नोकऱ्या धोक्यात

केवळ उन्नीकृष्णन आणि स्मार्ट क्रिएशन्सच नाही तर टीडीबीचे अधिकारी देखील या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार आहेत. टीडीबीच्या अधिकाऱ्यांना सोन्याच्या व्यवहारांची आणि बेकायदेशीर हस्तांतरणाची माहिती होती हे नोंदी स्पष्टपणे दर्शवतात.”

 

 

Related Articles