महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली प्रकरण डोनाल्ड ट्रम्प पर्यंत गेले

The Jumpli affair between two Mahayuti ministers reached Donald Trump.

 

 

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरु असलेला राजकीय तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे.

 

शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत स्पर्धा आता मिश्किल टोलेबाजीच्या नव्या रंगतदार वळणावर पोहोचली आहे.

मंत्री लोढा कुठे आहेत? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते; मनसेचा हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल, असे मिश्कील वक्तव्य केले होते. आता मंत्री गिरीश महाजन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत दादा भुसे यांना डिवचले आहे.

 

नाशिकचे पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्या विरोधामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांना ते पद सोडावे लागले. तेव्हापासून नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा सतत चर्चेत आहे.

 

नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी बंद दाराआड चर्चा केली होती.

उद्धव ठाकरे म्हणाले , शेतकऱ्यांचा पॅकेज म्हणजे महायुती सरकारची ही सर्वात मोठी थाप

या बैठकीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघाला का? असा प्रश्न दादा भुसे यांना विचारण्यात आला होता. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी “हा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल,” असे मिश्किल उत्तर दिले होते. या विधानावर उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली होती.

 

दादा भुसे यांच्या ट्रम्पसंदर्भातील वक्तव्य केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या पलटवार केला होता. “डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला दारात उभं करतात का ते आधी पाहा.

गुप्तधनाचे आमिष दाखवत भोंदूबाबाने लावला लाखोंचा चुना

सध्या ट्रम्प हे आपल्या देशाशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ज्या पद्धतीने वागत आहेत, आपल्या देशावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत, ते पाहता डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला जवळ तरी उभे करतात का ते पाहा, असे म्हणत ठाकरे गटाने दादा भुसेंवर टीका केली होती.

 

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी देखील दादा भुसे यांना डिवचले. “भुसे यांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ठ संबंध कदाचित असतील.

 

AI मुळे जगभरातील सुमारे 30 कोटी नोकऱ्या धोक्यात

त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील किंवा फोन करून सांगतील की काही तरी करा म्हणून. माझे तसे कोणतेच संबंध अमेरिकेशी नाहीत किंवा मी तिकडे गेलोही नाही.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील माझी नाशिकचे पालकमंत्रीपद तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी चर्चा झालेली नाही,” असे म्हणत गिरीश महाजन यांनी दादा भुसेंना डिवचले.

मंदिरातून 42 किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रीपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ,

 

माणिकराव कोकाटे हे चारही नेते नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत. तिढा न सुटल्यामुळे चारही मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आले असून,

बड्या नेत्याने दिल्लीत जाऊन घेतली अमित शहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

गिरीश महाजन यांना समितीप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. यावरून पक्षांतर्गत मतभेद जाणवत आहेत. आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा नेमका कधी सुटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

Related Articles