मुख्यमंत्री म्हणतात निवडणुकीत युती तर त्यांचे मंत्री म्हणतात युती नाही झाली तर पाडापाडी

The Chief Minister says there will be an alliance in the elections, while his ministers say there will be a fight if there is no alliance.

 

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढायचे की स्वतंत्र लढायचे याबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल तेथे ठीक आहे,

 

पण जर महायुतीत निवडणूक युती झाली नाही तर पाडापाडीसाठी आम्ही एकमेकांसमोर उभे राहणार, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सदानंद शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाजन यांनी हा थेट इशारा दिल्याने महायुतीत घमासान सुरू होण्याची लक्षणे आहेत.

पाहा VIDEO; प्रियांका गांधींनी चक्क मागितली आलिया भट्टची माफी; काय घडले कारण ?

पुढील दोन ते तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

 

मात्र, अद्याप महायुतीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की, स्वतंत्रपणे लढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत.

आता शाळांमध्ये मराठी भाषा, राज्यगीत गायन अनिवार्य

मात्र, ज्या ठिकाणी शक्य नसेल अशा काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीतील नेते सांगत आहेत.

 

मात्र, अलीकडे महायुतीतून उलटसुलट वक्तव्ये केली जात असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी पाडापाडीची भाषा केल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नाही याचे संकेत मिळत आहेत.

आता शाळांमध्ये मराठी भाषा, राज्यगीत गायन अनिवार्य

‘महायुती मिळून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण काही ठिकाणी जमले नाही, तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आम्ही करु. मात्र, युती झाली नाही तर आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडेच उभे राहणार आहोत.

 

मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी आम्ही एकमेकांना पाडणारच आहोत, असेही महाजन म्हणाले. जळगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

गुप्तधनाचे आमिष दाखवत भोंदूबाबाने लावला लाखोंचा चुना

दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे, असे निर्देश जिल्हा पातळीवरील युनिट्सना देण्यात आले आहेत.

 

मात्र, काही ठिकाणी युती शक्य न झाल्यास मित्रपक्षांवर टोकाची टीका न करण्याचेही स्पष्ट निर्देश पक्ष संघटनेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

 

फडणवीस यांनी पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणले, पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक परिस्थितीचा सखोल आणि सकारात्मक आढावा घेण्यात आला आहे.

AI मुळे जगभरातील सुमारे 30 कोटी नोकऱ्या धोक्यात

पुणे येथील आढावा पूर्ण झाल्यावर आता कोकण विभागाचा आढावा मुंबईत घेण्यात येणार आहे. आजच्या आढाव्यात अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे,

 

असे त्यांनी नमूद केले. पक्ष संघटनेसाठी बूथ रचना आणि निवडणुकीच्या संदर्भात पुढचे दिशानिर्देश देण्यासाठी हे आढावा सत्र महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

बड्या नेत्याने दिल्लीत जाऊन घेतली अमित शहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
मदतीस विलंब झाल्यास मोर्चा काढण्याच्या उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला राजकीय उत्तर दिले. हे विरोधी पक्षाचे काम आहे,” असे ते म्हणाले.

 

त्यांनी पुढे सांगितले की, याचा अर्थ मदतीवर त्यांचा विश्वास आहे आणि आम्ही केलेली मदतही त्यांना मान्य आहे. “आम्ही उद्धवजींना रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट देऊ,” असा टोला त्यांनी लगावला.

 

अहिल्यानगर जिल्ह्यात पासपोर्टसाठी अर्ज करताना घायवळला क्लीन चीट कशी मिळाली, यावर मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, “तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय – दबावापोटी पोलिसांनी त्यांना पूर्णपणे क्लीनचिट दिली

महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली प्रकरण डोनाल्ड ट्रम्प पर्यंत गेले

आणि यांच्यावर कोणताही – गुन्हा नसल्याचा अहवाल सादर केला. यावर कठोर कारवाईचे संकेत देताना मुख्यमंत्री म्हणाले, “अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे, त्याला कोणत्याही पक्षाने थारा देता कामा नये.

 

अशा प्रवृत्तीवर कारवाई केली जाईलच, पण त्याचबरोबर ज्यांनी – दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल सादर केला त्यांचीही चौकशी – केली जाईल.

मोबाईल कंपन्यांकडून 5G च्या नावाखाली ग्राहकांची लुट?

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारी – समितीच्या घोषणेतील विलंबाबाबत कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट करत, – पुढच्या आठ-दहा दिवसांत ती कार्यकारिणी जाहीर होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

 

 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादावर मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक टीका कोणीच कोणावर करू नये, हे आमचे स्पष्ट मत असल्याचे सांगितले.

तुम्ही सकाळी वापरणारी कोलगेट खरी आहे काय? पाहा :VIDEO

‘चंद्रकांत दादांनी स्वतः पुढाकार घेऊन वैयक्तिक वाद आणि चिखल फेक मिटवण्यासाठी प्रयत्न केले आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. रवींद्र धंगेकरांच्या टीकेवर बोलताना, ‘मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे, मी त्यांचे जे बॉस साहेब त्यांच्याशी बोलेल,’ असे सांगत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

 

 

Related Articles