मंदिरात चेंगराचेंगरी 10 भाविकांचा मृत्यू

10 devotees die in temple stampede

 

 

आंध्र प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीझाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

असंख्य भाविक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वेगाने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

घरातून बाहेर पडू नका ,राज्यावर भलंमोठं संकट

आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने रेलिंग तुटले.

 

यामध्ये 8 महिला आणि 2 लहान मुले अशा 10 भविकांचा मृत्यू झाला आहे. 25 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु: ख व्यक्त केले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याब घटनेची दखल घेतली आहे. तसेच केंद्र सरकारने मदत देखील जाहीर केली आहे. मृतांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून मोठा इशारा

तर जखमी नागरिकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांची गर्दी अचानक वाढल्याने तेथे चेंगराचेंगरी निर्माण झाली. यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

 

शनिवारी झालेल्या या चेंगराचेंगरीत जवळपास 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. या गर्दीत हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती. अचानक धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरी झाली.

बच्चू कडूंचे आंदोलन चिघळले ,हायकोर्टाचे आदेश आंदोलनस्थळ रिकामे करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर लगेचच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरातील प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली.

मंत्रिमंडळ निर्णय ; २८ ऑक्टोबर, २०२५

भाविक शिडीवरुन वर मंदिरात जात असताना चेंगराचेंगरी झाली. यावेळी गोंधळ होऊन अनेक भाविक एकमेकांवर कोसळले. यात गर्दीखाली दबून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची पथकं आणि आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विमानाचा भीषण अपघात, सर्व प्रवाशांचा मृत्यू;पाहा VIDEO

या घटनेनंतर राज्याचे कृषी मंत्री के. अचन्नायडू मंदिरात पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मंदिर अधिकाऱ्यांची भेट घेतली. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आलं आहे.

 

 

Related Articles