बच्चू कडूंचे आंदोलन चिघळले ,हायकोर्टाचे आदेश आंदोलनस्थळ रिकामे करा
Bachchu Kadu's protest escalates, High Court orders vacate protest site

नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. अशातच या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत.
बस चालकाने चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली
‘भलेही तुम्ही कर्जमाफी नंतर करा पण त्याचा जीआर तरी आज काढा’, अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या वीस तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागपूरच्या महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव, उसाची एफआरपी, दुधाचे दर आणि सातबारा कोरा करणे यासह शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ आणि दिव्यांगांच्या एकूण २२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे दोन प्रतिनिधी आंदोलकांशी चर्चा करणार असून, या चर्चेतून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाले असून टायर पेटवुन रोड रोखले आहे. गेल्या दोन तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर-मुबंई समृद्धी महामार्ग रोखलाय.
उमेदवाराचे स्वागत एखाद्या राजाप्रमाणे; १०१ लिटर दुधाने आंघोळ
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने याची अद्याप दखल घेतली नाही. आज संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दोन तासांपासून वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखली आहे.
हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा असल्याचे सांगत, स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला आहे.सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक घडवून आणू. असा इशारा सरकारला दिला आहे.
मंत्रिमंडळ निर्णय ; २८ ऑक्टोबर, २०२५
या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
तर आज 4 वाजताच्या सुमारास राज्याचे गृहराज्य मंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडूंशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आता गृहराज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्याच्या शिष्ठाईला यश येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ठिय्या आंदोलनामुळं होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोईची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो दखल घेतली आहे. बच्चू कडू यांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्वतःला आणि स्वतःच्या आंदोलन सहकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या स्थळावरून बाजूला व्हावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.
लाडक्या बहिणींच्या E KYC ची मुदत संपणार,शेवटची संधी
बच्चू कडू यांना आंदोलनासाठी 28 ऑक्टोबर साठीची आणि तीही परसोडी गावाजवळच्या मैदानावरील आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती.ती परवानगी 28 तारखेसाठी होती. मात्र, ठिय्या आंदोलन आज म्हणजे 29 तारखेला ही सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना खास करून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे
.परिसरात अनेक रुग्णालये सुद्धा आहेत. अनेक रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागला आहे, असे सुद्धा नागपूर खंडपीठाच्या आदेशात म्हणण्यात आले आहे.आदेशात 1 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलनासंदर्भात जी याचिका स्वीकारली होती त्याचा उल्लेखही करण्यात आला आहे…
विमानाचा भीषण अपघात, सर्व प्रवाशांचा मृत्यू;पाहा VIDEO
पोलीस अधिकाऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू असलेली जागा मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू करावी असेही आदेशात म्हटले आहे.
तसेच नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी आदेशाची पूर्तता केल्यासंदर्भातील रिपोर्ट उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित क्षेत्राचे पोलीस अधिकारी तसेच महामार्ग पोलिसांनी आदेशाची पूर्तता करावी असेही न्यायालयाने त्यांच्या निर्देशात म्हटले आहे.
बच्चू कडू यांनी आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, असं म्हटलं. मात्र, जर आंदोलन करायला आलेले सोबतचे लोक आंदोलन सुरू ठेवायचे आहे असे म्हणत असेल तर आम्ही आंदोलन सुरू ठेवू, असं बच्चू कडू म्हणाले.
महिला डॉक्टर प्रकरणाची धग थेट दिल्लीत
आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातला हा संघर्ष आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही. मात्र, लोक न्यायालयाचे ऐकणे सोडणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
कोर्टाचा आदेश घेऊन पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी बच्चू कडू यांना भेटले. यामध्ये पोलिसांच्या स्पेशल ब्रॅचचे डीसीपी सातव यांचा समावेश होता.
सरकारच्या निर्णयाने गोखले बिल्डर्सचे 230 कोटी बुडणार?
बच्चू कडू यांनी साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दांची औलाद आहे. असं म्हटलं जेल कमी पडेल, अटक करा,आता रामगिरी ताब्यात घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तर, पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत बच्चू कडू यांना दाखविली.









