विधानपरिषदेच्या 17 पैकी 5 जागा बिनविरोध
5 out of 17 Legislative Council seats elected unopposed.


राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं होतं.
उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या परंतु तिकीट न मिळालेल्या अनेक नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला मोठं यश आलं आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
1 लाखाची लाच एसीबीनं शिकवला धडा
पुणे विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आश्चर्यकारकरित्या माघार घेतली.
अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे खुद्द पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच आपण स्वत: उमेदवारी दिलेल्या व्यक्तीला फोन करून माघार घेण्याच्या सूचना केल्या.
परभणी- हिंगोली विधानपरिषदेची उमेदवारी डॉ नावंदर यांना
शरद पवार यांच्या एका फोनमुळे पुण्याची सारी सूत्रे झटक्यात पालटली असून विक्रम काकडे यांच्यापुढील अडसर दूर होऊन बिनविरोध निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
रायगड रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड घडलीय. मविआचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. मंत्री नितेश राणेंसोबत बाळ मानेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात अर्ज मागे घेतला.
मविआच्या इतर घटक पक्षाच्या नगरसेवकांच्या सह्या सूचक म्हणून न मिळाल्यानं अर्ज मागे घेत असल्याचं बाळ मानेंनी सांगितलं. घोडेबाजार सुरू असताना निवडणूक लढणं योग्य नसल्यानं माघार घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
विधान परिषदेसाठी महायुतीचे जागावाटप ;पाहा कोणाला कोणत्या जागा
बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड झाली आहे. तर दुसरीकडे बाळ मानेंची ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली. त्यामुळं मविआकडून सय्यद फारूख यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरु होता. मात्र, सय्यद फारुख यांनी अर्ज मागं घेतला.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.








