घरातून बाहेर पडू नका ,राज्यावर भलंमोठं संकट
Don't step out of your house, a huge crisis is looming over the state.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नोव्हेंबर महिना आला तर पाऊस काही थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
बच्चू कडूंचे आंदोलन चिघळले ,हायकोर्टाचे आदेश आंदोलनस्थळ रिकामे करा
भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबईसह, पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दिवाळी झाली तरी राज्यात पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लाडक्या बहिणींच्या E KYC ची मुदत संपणार,शेवटची संधी
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात
महिला डॉक्टर प्रकरणाची धग थेट दिल्लीत
सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत.
तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती.
त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे.
बच्चू कडूंचे आंदोलन चिघळले ,हायकोर्टाचे आदेश आंदोलनस्थळ रिकामे करा
गेल्या आठवड्याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे भाताचे पीक चिखलात रुतले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले भातपिकाला नवीन कोंब आलेले आहेत.
या परिस्थितीत उत्पादनात ५० टक्केपर्यंत घट होऊ शकते दरम्यान अजूनही तालुक्यातील डोंगराळ भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.






