मतदार यादीत फोटो आल्यानंतर काय म्हणाली ब्राझीलची मॉडेल लारिसा ?
What did Brazilian model Larissa say after her photo appeared on the voter list?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल (5 नोव्हेंबर) तिसऱ्यांदा व्हिडीओ सादरीकरण करत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोटाळ्याचा आरोप केला.
दरम्यान, ‘H’ फाईल्स सादर करताना राहुल गांधींनी एक धक्कादायक आरोप केला. यामध्ये एकाच व्यक्तीचा फोटोचा वापर 22 वेगवेगळ्या नावांनी मतदान करण्यासाठी करण्यात आला होता आणि ती दुसरी कोणी नसून ब्राझीलियन मॉडेल असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.
बच्चू कडूंचे आंदोलन चिघळले ,हायकोर्टाचे आदेश आंदोलनस्थळ रिकामे करा
राहुल गांधींच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. आता स्वत: त्या ब्राझीलियन मॉडेलने एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. सदर ब्राझीलियन मॉडलचं नाव लारिसा असल्याचं समोर आलं आहे. तसेच लारिसा आधी मॉडेलिंग करायची, आता त्यापासून ती दूर आहे.
नमस्कार इंडिया, मला भारतीय पत्रकारांसाठी एक व्हिडीओ बनवण्यास सांगण्यात आले होते. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही.
उद्धव ठाकरेंच्या कुटूंबांचे नाव मतदार यादीतून हटविण्याचा प्रयत्न
मी कधीही भारतात गेले नाही. मी एक ब्राझिलियन मॉडेल आहे. मला भारतीय लोक आवडतात. खूप खूप धन्यवाद. नमस्ते…, असं लारिसा म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण खूप गंभीर झाले आहे.
काही भारतीय पत्रकार माझ्याकडून माहिती मागत आहेत. पहा, मी येथे आहे. काही भारतीय पत्रकार मला शोधत आहेत आणि माझी मुलाखत घेऊ इच्छितात. मित्रांनो,
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक
मी सर्वांना मुलाखती दिल्या आहेत, प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. माझा फक्त फोटो वापरण्यात आला, असंही लारिसाने सांगितले.
हरियाणात एका महिलेचे फोटो मतदारयादीत वेगवेगळ्या नावांनी व तपशिलांसह अनेकवेळा वापरण्यात आले. ब्राझीलमधील महिला मॉडेल असलेल्या मॅथ्यूस फेरेरो यांचा हा फोटो असून,
जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा;उद्धव ठाकरे
त्यांना स्वीटी, सीमा, सरस्वती अशी नावे मतदारयाद्यांत देण्यात आली आहेत, असं राहुल गांधींनी सांगितले. त्यांना दिलेली 22 वेगवेगळी नावे व त्याबरोबर या मॉडेलचा फोटो अशा नोंदी मतदारयाद्यांत आढळल्या आहेत, असा दावा राहुल गांधींनी केला होता.
राहुल गांधी यांनी आज काँग्रेस कार्यालयात 1 तास 20 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बिहारमध्ये ऑपरेशन सरकार चोरी सुरू असल्याचा आरोप केला.
राहुल यांनी बिहारमधील पाच मतदारांना मंचावर बोलावले. प्रत्येकाने त्यांची नावे मतदार यादीतून वगळल्याचे सांगितले. राहुल म्हणाले की हरियाणामध्ये 3.5 लाख मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट,10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
बिहारमध्येही हाच ट्रेंड पुन्हा सुरू होत आहे. लोकशाही उलथवून टाकण्यासाठी निवडणुकीपूर्वी मतदार याद्या जाहीर केल्या जातात.
त्यांनी त्यांच्या सादरीकरणात हरियाणा मतदार यादी दाखवली आणि सांगितले की हरियाणा निवडणुकीत 10 मतदान केंद्रांवर ब्राझिलियन मॉडेलने 22 वेळा मतदान केले.
रेल्वेचा मोठा अपघात ;पॅसेंजर ट्रेनचा डबा थेट मालगाडीवर चढला;पहा VIDEO
यामुळे 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत 25 लाख मतांची चोरी झाली. राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर इतर अनेक आरोप केले.
Here's the reaction of the Brazilian Model Larissa seen in the viral image shared by @RahulGandhi during his Vote Chori Press Conference. https://t.co/qyF9dCXF5x pic.twitter.com/Ea2SPgll7z
— Mohammed Zubair (@zoo_bear) November 5, 2025
Here's the reaction of the Brazilian Model Larissa seen in the viral image shared by @RahulGandhi during his Vote Chori Press Conference. https://t.co/qyF9dCXF5x pic.twitter.com/Ea2SPgll7z
— Mohammed Zubair (@zoo_bear) November 5, 2025





