अब्दुल सत्तार यांनी दिल्या आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका
Abdul Sattar donated an ambulance worth Rs 32 lakhs to his own educational institution from MLA funds.

शिंदे सरकारच्या काळात वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेले शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
2014 सालच्या एका प्रकरणामुळे अब्दुल सत्तार हे पुन्हा गोत्यात आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी मंत्री असताना प्रत्येकी 16 लाख रुपयांच्या दोन रुग्णवाहिका विकत घेतल्या होत्या.
‘व्हीव्हीपॅट नाही तर मतपत्रिकेवर मतदान घ्या ,मागणीची कोर्टाकडून गंभीर दखल
यासाठी अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्या आमदार निधीचे पैसे वापरले होते. मात्र, या दोन्ही रुग्णवाहिका अब्दुल सत्तार यांच्या प्रगती शिक्षण संस्थेला देण्यात आल्या होत्या. यावरुन प्रचंड वादंग निर्माण होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
याप्रकरणी आता न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर पोलिसांना तपास करुन याप्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे निर्देश देण्यात आल्याने अब्दुल सत्तार यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचा संताप निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
शासकीय नियमानुसार, कोणतेही खासगी रुग्णालय किंवा संस्थेला सरकारी पैशाने रुग्णवाहिका देता येत नाहीत. मात्र, अब्दुल सत्तार यांनी हा नियम धाब्यावर बसवला.
त्यांनी शासनाची दिशाभूर करुन सरकारी संपत्तीचा अपहार केला. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली. तसेच ज्या संस्थेला रुग्णवाहिका देण्यात आल्या, ती संस्था आपलीच आहे,
ही बाबही अब्दुल सत्तार यांनी लपवली. याविरोधात गणेश शंकरपल्ली यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती.
मातोश्रीवर ड्रोनद्वारे उद्धव ठाकरेंवर हेरगिरी ?
त्यामुळे गणेश शंकरपल्ली यांनी सिल्लोड न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने आता याप्रकरणात पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या अहवालात पोलीस काय माहिती देणार, हे पाहावे लागेल. मात्र, या अहवालात एखादी नकारात्मक टिप्पणी असल्यास ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आजोबांनी वाढवलं टेन्शन; पार्थ पवार अडचणीत येणार?
काही दिवसांपूर्वी सिल्लोड नगरपरिषदेच्या मतदार यादीत हेरफेरी असल्याचा आरोप करत भाजपने अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलन केले होते.
आमदार अब्दुल सत्तार हे गेल्या निवडणुकीत मयत झालेल्या लोकांच्या मतदानावर निवडून आले आहेत. जे मेलेले लोक होते,
भरलेली स्कूल बस 150 फूट खोल दरीत कोसळली
त्यांच्या नावावर त्यांनी मतदान करून घेतले. ‘मरेल माणसावर निवडून आलेला आमदार तो म्हणजे अब्दुल सत्तार’, अशी टीका स्थानिक भाजप नेत्यांनी केली होती.








