हवामान विभागाने दिला मोठा इशारा;7 राज्यात अलर्ट, मोठं संकट, हाय अलर्ट जारी
The meteorological department has issued a major warning; alert in 7 states, a big crisis, high alert issued.

राज्यातील थंडीची लाट ओसरली असून गारठा कायम आहे. सकाळच्यावेळी कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी कमी झाल्या आहेत. उत्तरेकडे थंडी वाढली आहे.
देशात काही भागात पाऊस सुरू आहे. मॉन्सून जाऊन काही महिने झाले असले तरीही पाऊस काही राज्यांमध्ये अजूनही आहे. राज्यातही ऐन नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होता.
आता विमानाचा हा नियम ट्रेनसाठी देखील लागू,रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका
5.5 अंश सेल्सिअसपर्यंत राज्यातील पारा घसरताना दिसत आहे. थंडी वाढत असतानाच वायू प्रदूषण हे मोठे आव्हान लोकांपुढे आहे. आरोग्यासाठी घातक हवा झाली. या हवेमुळे लोक सतत आजारी पडत आहेत.
पालिकेकडून वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, तरीही फार काही परिणाम दिसत नाही. दिल्ली, मुंबई आणि पुण्यात हवा घातक बनली आहे. यामुळे लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
चार तहसीलदारांसह 10 जणांवर निलंबनाची कारवाई
थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे देशाच्या अनेक भागांवर परिणाम होत आहे. धुक्यामुळे अनेक भागांमध्ये दृश्यमानता अत्यंत कमी झाली असून, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणी येत आहेत.
धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 5.5 अंश सेल्सिअस तापमान होते. निफाडसोबतच जेऊर येथे 8 अंश तापमानाची नोंद झाली. मालेगाव, अहिल्यानगर, भंडारा, नागपूर आणि यवतमाळमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
भाजपने नगरपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 16 पदाधिकाऱ्यांना केले निलंबित
परभणी येथे 9 अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात सध्या सातत्याने थंडीमध्ये चढउतार बघायला मिळत आहे. उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने 18 ते 20 डिसेंबर दरम्यान या राज्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,
ठाकरे बंधूच्या युतीबाबत घोषणेची मोठी अपडेट समोर
पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि चंदीगढ या राज्यांमध्ये थंडी सातत्याने वाढत आहे. पुढील काही दिवसांमध्ये पारा अजून घसरेल.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 18 डिसेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज असून 19 ते 20 डिसेंबर दरम्यान पंजाबमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
18 बोगस कर्मचारी निलंबित, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
17 ते 20 डिसेंबर दरम्यान तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, लडाख, पुद्दुचेरी या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.





