बापरे.. महापालिकेचा उमेदवारी अर्ज 21 पानांचा,वकील अर्ज भरण्यासाठी घेताहेत एक लाखांची फी

Oh my god.. Municipal Corporation's candidacy application is 21 pages long, lawyers are charging a fee of one lakh to fill the application.

 

 

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर घडामोडींना वेग आला. अशातच इच्छुक उमेदवारांनी देखील चाचपणी, बैठका, मुलाखती दिल्या.

अजित पवारांच्या नेता पैशांची बॅग घेऊन मोजतोय कॅश

अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक अर्ज भरून हवा असल्यास 1 लाख रुपये किंमत मोजावी लागत आहेत.

 

एक लाख द्या आणि आम्ही अर्ज भरून देऊ असेल अनेक वकिल्यांच्या घरासमोर बोर्ड लावण्यात आले आहेत. त्याचं कारण म्हणजे पालिका निवडणूक लढवण्याची 21 पानांचा अर्ज भरावा लागणार आहे.

आता विमानाचा हा नियम ट्रेनसाठी देखील लागू,रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका

हा अर्ज किचकट असल्याचं इच्छुकांच मत आहे. त्यात अर्ज बाद झाल्यानंतर अपील करता येणार नाही. त्यामुळे हा अर्ज तर काळजीने भरावा लागणार आहे.

 

त्यासाठी वकिलांकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे. इच्छुक उमेदवार जाणकारांना उमेदवारी अर्ज भरायचे एक लाख रुपये देत आहेत.

 

या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढताना दिसत आहे. अवघ्या एका चुकांमुळे उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती असल्याने अनेकांनी स्वतः अर्ज भरण्याचा धोका न पत्करता कायदेशीर सल्लागारांचा मार्ग स्वीकारला आहे.

हवामान विभागाने दिला मोठा इशारा;7 राज्यात अलर्ट, मोठं संकट, हाय अलर्ट जारी

विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी आकारण्यात येणारी एक लाख रुपयांची रक्कम ही मोठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, ‘उमेदवारी टिकवण्यासाठी हा खर्च अपरिहार्य आहे,’

 

अशी मानसिकता इच्छुकांमध्ये तयार झाली आहे. परिणामी, निवडणूक लढवण्यापूर्वीच आर्थिक गणितं जुळवावी लागत असून, महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया अधिक खर्चिक आणि गुंतागुंतीची होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

पाहा ;वसमत नगरपरिषद निवडणुकीत सर्वच उमेदवारांना बुथनिहाय पडलेली मते

छ. संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची पहिली उमेदवारी यादी जाहीर
AIMIM कडून छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये –

 

1) प्रभाग 1 – अझहर अयुब खान

2) प्रभाग 3 – इम्रान पटेल

3) प्रभाग 9 – काकासाहेब काकडे

4) प्रभाग 9 – मतीन माजेद शेख

5) प्रभाग 12 – हाजी शेरखान अब्दुल रहमान खान

6) प्रभाग 28 – साबेर पाशु शेख

7) प्रभाग 28 – अब्दुल मतीन खान

8) प्रभाग 16 – सय्यद फरहान नेहरी

मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी

 

बड्या नेत्यांकडून मुलं, नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग
काही नेते आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा पत्नीसाठी, तर काहीजण आपल्या भाऊ-बहिणीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

 

त्यामुळे नातेवाईकांना तिकीट मिळवून देण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढताना दिसत आहे. या ‘वजनाचा’ पक्षश्रेष्ठींवर नेमका किती प्रभाव पडतो,

पुढील दोन दिवसात किमान तापमानात मोठे बदल

हे आगामी उमेदवार यादीतून स्पष्ट होईल. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील इच्छुक नातेवाईकांची संख्या लक्षणीय असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

छत्रपती संभाजीनगर
शिवसेना शिंदेगट
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय सिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी उमेदवारी मागितली आहे.

नगर परिषद निवडणुकीत EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, मोठा गदारोळ

आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषिकेशसाठी उमेदवारी मागितली आहे.
माजी आमदार किशनचंद तणवाणी यांनी आपला मुलगा आणि भावासाठी उमेदवारी मागितली आहे.

 

माजी महापौर नंदू घोडेले यांनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे.
माजी महापौर विकास जैन यांनी स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे.

ठाकरे बंधूंची युती होताच शरद पवारांचा मोठा निर्णय

भाजप
खासदार भागवत कराड हर्षवर्धन आणि बहिण उज्वला दहिफळे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.
आमदार नारायण कुचे यांनी पत्नी शीतलसाठी उमेदवारी मागितली आहे

 

आमदार संजय केनेकर यांचा मुगला हर्षवर्धन यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.
गुजरातचे मंत्री सी आर पाटील यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण हिने उमेदवारी मागितली आहे.

मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी

शिवसेना ठाकरे गट
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आपला भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे.
चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन यांना उमेदवारी मागतिली आहे .

 

त्याचबरोबर इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल देखील निवडणुकीसाठी इच्छुक आल्याची चर्चा आहे.

 

 

Related Articles