अजित पवारांच्या नेता पैशांची बॅग घेऊन मोजतोय कॅश

Ajit Pawar's leader is counting cash while holding a bag of money.

 

 

शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

‘हिजाब’ वरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

मात्र अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी तो फेटाळून लावला होता. मात्र आता युगेंद्र पवार यांनी जो दावा केला होता त्या दाव्याला बळ देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जगाचा अंत जवळ आला? पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत;पाहा VIDEO

अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोसिन पठाण यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटलांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाच्या या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

 

बारामतीत एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) बारामती शहर अध्यक्ष जय पाटील व वॉर्ड 2 मधील बिनविरोध निवडून आलेल्या अनुप्रिता अक्षय डांगे नगरसेविकेच्या नवऱ्याचा पैशांच्या बॅगेतून पैसे काढून मोजत आहेत.

काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश

बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करून मतदारांना अमिष दाखवले जात आहे सदर बाबीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

तर दुसरीकडे जय पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. यासंदर्भात आपण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आनंदाची बातमी; लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार 3000 रुपये

आता मुळात हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याचा तपास आपण करावा, आणि जर हा व्हिडिओ खरा असेल तर निवडणूक काळात यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला.

 

ते पैसे हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये का मोजत आहेत? अनुप्रिता अक्षय डांगे यांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी पैसे दिले आहेत का व अशा इतर प्रश्नांवर SIT व ACB मार्फत तातडीत चौकशी व्हावी.

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला

जर हा व्हिडिओ खरा असेल तर हा पैसा कुठून आला व याचा वापर कुठे झाला? या व्हिडिओ मध्ये ही दोघे पैशाचे नोटांचे सीरियल मोजताना दिसत आहेत. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मोसीन पठाण यांनी केली आहे

 

युगेंद्र पवार यांनी लावलेल्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपप्रमाणे ज्या 8 वॉर्डात बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत, त्या वॉर्डात जे निवडून व ज्यांनी माघार घेतली

भाजपने नगरपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 16 पदाधिकाऱ्यांना केले निलंबित

त्यांची एसआयटी, एसीबी, ईडीमार्फत चौकशी व्हावी आणि या 8 वार्डात पण पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

जय पाटील यांनी मात्र हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगत आरोप फेटाळले आहेत. हा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आला असून,

चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहिणी बनून 21 कोटी लाटले

आपण या प्रकऱणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करतील आणि सत्य समोर आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Related Articles