14 ठिकाणी महायुती तुटली, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली
The grand alliance broke up in 14 places; loyalty was washed away in the rain of money.
राज्यभरात 14 महानगरपालिकेत महायुती तुटली आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि मित्रपक्ष एकमेकांच्या छातड्यावर बसले आहे.
तिकीट पाटपात भाजपने नाशिकपासून छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यात महिलांनी तरुणींनी काय गोंधळ घातला हा महाराष्ट्राने पाहिला.
5 लाखांची लाच घेताना GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक
बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून सर्वच पक्षांनी केलंय. गुंडांची रीघ लागली असून गजा मारणेच्या बायकोलाही अर्ज देण्यात आलाय.
शिवाय रीघ लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी अर्जासोबत 5 कोटी, 10 कोटी रुपये दिले जात आहे त्यासाठी ही रीघ आहे.
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून 10 कोटी, तर राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी 5 कोटीची रीघ असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यावर हल्लाबोल केलाय.
महाराष्ट्राच्या शेजारी GPS ट्रॅकर असलेल्या पक्षाच्या घिरट्या; सुरक्षा यंत्रणा सतर्क
निष्ठावंत कोणी नसतं, निष्ठावंतांची काय अवस्था आहे हे काल पुण्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये काय झालं हे आपण बघितलंय. भाजप, शिंदे गट
आणि अजित दादांचा पक्ष जो 5 कोटी, 10 कोटींचा आर्थिक पॅकेज देत आहे त्यासाठी हा गोंधळ आहे. निष्ठा पैश्याच्या पावसात वाहून गेली, असे देखील संजय राऊत म्हणाले.
हवामान विभागाचा मुसळधार पाऊस, आणि अतिवृष्टीचा इशारा
नाशिकपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत जो गोंधळ झाला तो पाहण्यासारखा आहे. शिवसेनेतर्फे याद्या जाहीर केल्या जात नाही. उद्या कळेल तुम्हाला कोणाला काय दिलं आहे.
याद्या जाहीर करायच्या हा प्रकार बहुतेक थांबवले आहे. काल संध्याकाळपर्यंत ज्यांनी शिवसेनेनं अर्ज दिले त्यांनी अर्ज भरले. मनसेच्या उमेदवारांनी देखील अर्ज भरलेत.
रेल्वेमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार, कारण घडले काय?
काही ठिकाणी मनसे आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरलेत. शिवाय नाशिकपासून संभाजीनगरपर्यंत जो गोंधळ झाला तो पाहण्यासारखा आहे. भाजपाकडे गुंडाची रीघ आहे.
मात्र पाच कोटी, दहा कोटींसाठी ही रीघ आहे. शिवसेनेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सामान्य मराठी माणसं, आमचे कार्यकर्ते निवडणूक लढवत आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये
दरम्यान, जी बंडखोरी झाली असं म्हणताय त्याला मी बंडखोरी असं मानत नाही. एका पक्षात तिकीट मिळालं नाही ते दुसऱ्या पक्षात गेले, हे कसलं बंड? या देशात बंड एकच झालं,
ते 1857 ला इंग्रजांच्या विरोधात जे झालं तेच बंड. तुमची निष्ठा पपक्षावर आहे कि तिकिटावर? असं बाळासाहेब नेहमी सांगायचे. ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेलेत.
इंडिगोची 80 उड्डाणं रद्द,काय घडले कारण ?
तिकीट नाकारल्यानंतर जर उमेदवार दुसरीकडे जाऊन उमेदवारी घेतो. म्हणजे दहा दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहेत. यांना निष्ठावान किंवा बंडखोर नाही तर बेईमानच म्हटले पाहिजे, अशी टीका हि संजय राऊतांनी केलीय.









