लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये
Rs. 4500 will be deposited into the accounts of beloved sisters.

नवीन वर्ष सुरू होताच महाराष्ट्र सरकार लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. २०२६ मध्ये मकर संक्रातीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण तीन हप्ते म्हणजेच ४५०० रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.
आता या प्रक्रियेशिवाय रेल्वेचे तिकिटे कन्फर्म होणार नाहीत, कोणती प्रोसेस आहे जाणून घ्या…
तीन महिन्यांपैकी त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते ३००० रुपये देण्याचेही नियोजन सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे.
या बातमीमुळे राज्यभरातील लाडक्या bahinichi मकर संक्रांत गोड होणार असल्याचे म्हटले जात आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी राज्यभरातील स्त्रियांना आवाहन केले आहे.
उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा
या महिलांचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ होणार बंद
एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असतील तर बंद होणार हप्ता
२१ पेक्षा कमी वय असेल आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला
सरकारी नोकरदार असेल तर बंद होणार हप्ता
पुरुष लाभार्थी
चारचाकी वाहने असलेल्या महिला
केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिलांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. या ई-केवायसीमुळे पात्र
आणि अपात्र लाभार्थी शोधण्यात मदत होईल आणि गरजू आणि पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेत येईल असा या मागचा मुख्य हेतु आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय,होणार 2026 मध्ये पूर्ण अंमलबजावणी
ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढे प्रत्येक महिन्याच्या १० ते १५ तारखेपूर्वी मात्र, वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत लाभ दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे.
नगर परिषद निवडणुकीत EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, मोठा गदारोळ
मात्र आता सुरू असणाऱ्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढ मिळू शकते.









