पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा
The next 24 hours are critical, warns the meteorological department.
देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कडाक्याच्या थंडीनंतर अचानक राज्यात वर्षाच्या पहिल्याच दिवसी पाऊस झाला. झपाट्याने वातावरण बदलत आहे.
बापरे… राष्ट्राध्यक्षाला थेट बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं
उत्तरेकडून थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून गारठा वाढणार आहे. उत्तरेकडून राज्यात शीत लहरी येत आहेत आणि पारा अधिकच खाली जाताना दिसत आहे.
खासदार ओवेसींनी मोदींना ललकारले म्हणाले,तुमची 56 इंच छाती आहे तर….
पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून थंडी वाढली. काही भागात अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला.
जानेवारी महिना उजाडला असूनही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. मुंबईमध्ये वायू प्रदूषण हा मोठा मुद्दा बनले आहे. मुंबईत प्रचंड वायू प्रदूषण वाढले असून काल रात्री सर्वत्र फक्त
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ,होऊ शकते 6 वर्षांची बंदी?
आणि फक्त धूळ दिसत होती. आकाशात स्पष्ट काही दिसतही नव्हते. मुंबईतील वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीही वाढेल. जळगाव येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
भारताच्या अरुणाचल प्रदेशवर चीनची वाकडी नजर ,पेंटागॉनच्या रिपोर्टने जग हादरल
जळगावात 9.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्यानंतर धुळात 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दुसरीकडे जेऊर येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सतत हवामानात बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, गळ्यात दुखण्याच्या समस्या वाढल्या आहेत.
अजित पवार अचानक ‘नॉट रिचेबल’, सुरक्षारक्षक सोडून एकटेच निघून गेले
वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने नागरिकांना मास्क घालून फिरण्याचा सल्ला दिला. हेच नाही तर ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, अशांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असेही म्हटले.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजधानी दिल्लीतील तापमान 5 जानेवारीपर्यंत आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तापमान घटत असल्यामुळे हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये
थंडीच्या लाटेचा तब्बल पाच राज्यांना इशारा देण्यात आला. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे.




