भाजपला होतोय अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप?

Is the BJP regretting including Ajit Pawar in the Mahayuti alliance?

 

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार मोहीम सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून,

खासदार ओवेसींनी मोदींना ललकारले म्हणाले,तुमची 56 इंच छाती आहे तर….

खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही मोहीम शहरातील विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर केंद्रित असणार आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीत सारंकाही अलबेल नसल्याचं चित्र दिसतंय. यातून अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा भाजपला पश्चाताप होतोय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. काय घडलंय नेमकं? सविस्तर समजून घेऊया.

 

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ,होऊ शकते 6 वर्षांची बंदी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी भाजपला ‘लुटारूंची टोळी’ असे संबोधले.

 

एवढेच महापालिकेच्या कारभाराचे तीव्र शब्दांत वाभाडे काढले. यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव वाढला असून, निवडणुकीपूर्वीच युतीत फूट पडल्याचे चित्र दिसते.

 

पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांच्या आरोपांना कडवे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अजित पवार मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर आरोप करत आहेत,

 

हे त्यांनी लक्षात ठेवावे. तसेच भाजपने आरोप केले तर अजित पवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असा स्पष्ट इशारादेखील त्यांनी दिला.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये

रवींद्र चव्हाण यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. मी नेहमी देवेंद्र फडणवीस यांना खासगीत सांगितले होतो की, त्यांना महायुतीत सामील करताना सावधगिरी बाळगावी. यामुळे अजित पवारांना युतीत घेतल्याबाबत भाजपमध्ये नाराजी असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

ज्यांनी ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय.

,”हे” काम केले म्हणून ,मुंबईतील व्यापाऱ्याला देशातील पहिली शिक्षा

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुत्रावरही गुन्हे दाखल आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवारांनी ही भूमिका मांडली.

 

दरम्यान अजित पवारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे या आरोपांचं काय झालं याचं उत्तर त्यांनीच द्यावं असा टोला राऊतांनी लगावलाय.

आता या प्रक्रियेशिवाय रेल्वेचे तिकिटे कन्फर्म होणार नाहीत, कोणती प्रोसेस आहे जाणून घ्या…

त्यांचा काही वेगळा राजकीय मार्ग दिसतो आहे. एकूणच, पुणे आणि पिंपरी भागात भाजप आणि अजित पवार गट यांच्यात थेट सामना होत असून, महायुतीतील हा कलह निवडणुकीत भाजपसाठी आव्हान ठरू शकतो, असे चित्र आहे.

 

Related Articles